Jalgaon Bazar Samiti Election Result : जळगाव बाजार समितीवर शेतकरी पॅनलचा झेंडा!

Activists cheering after the results of market committee election on Sunday.
Activists cheering after the results of market committee election on Sunday.esakal

Jalgaon Bazar Samiti Election Result : बाजार समितीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना व कॉंग्रेसप्रणीत महाविकास आघाडीच्या शेतकरी विकास पॅनलने ११ जागा मिळवून सत्ता मिळविली आहे. शिवसेना (शिंदे गट) व भारतीय जनता पक्षाच्या युतीला सहा, तर एक जागा अपक्षाला मिळाली आहे. (Flag of shetkari panel on Jalgaon Bazar Samiti Election Result news)

जळगाव बाजार समितीवर कोणाची सत्ता राहणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील भाजप-शिवसेनेचे (शिंदे गट) सहकार पॅनल, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना व कॉंग्रेस महाविकास आघाडीचे शेतकरी विकास पॅनल यांच्यात लढत होती.

दोन्ही पॅनलने जोरदार प्रचार केला. मात्र, महाविकास आघाडीप्रणीत शेतकरी विकास पॅनलने ११ जागा मिळविल्या, तर युतीच्या सहकार पॅनलला सहा जागा मिळाल्या. एक अपक्ष विजयी झाला.

महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार

उमेदवारांची नावे व कंसात मते अशी : सेवा सहकारी सर्वसाधारण गट- सुनील सुपडू महाजन (४६८), मनोज दयाराम चौधरी (४४२), लक्ष्मण गंगाराम पाटील (४१३), श्‍यामकांत बळीराम सोनवणे (४०१), योगराज नामदेव सपकाळे (३६७),

जयराज जिजाबराव चव्हाण (३६४), व्यापारी गट- संदीप लक्ष्मण पाटील (४९७), महिला राखीव गट- लीना पंकज महाजन (४१२), ग्रामपंचायत गट-अनुसूचित जाती- जमाती- दिलीप काशिनाथ कोळी (३२९) ग्रामपंचायत गट-आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक-अरुण लक्ष्मण पाटील (३०२), सेवा सहकारी संस्था- इतर मागासवर्ग-पांडुरंग पाटील (३६७).

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Activists cheering after the results of market committee election on Sunday.
Market Committee Election Result : नांदगावला ‘शेतकरी विकास’चीच सत्ता! बाजार समितीत 15 जागांवर विजयी

भाजप-शिंदे गट युतीचे विजयी उमेदवार

सेवा सहकारी सर्वसाधारण गट-प्रभाकर गोटू सोनवणे (४१९), विमुक्त जाती भटक्या जमाती-समाधान लहू धनगर (३३), महिला राखीव-हेमलता प्रकाश नारखेडे (३८५), व्यापारी गट-राठी अशोक हरनारायण (४९७),

ग्रामपंचायत सर्वसाधारण गट-मिलिंद दत्तात्रय चौधरी (२६३), हमाल मापाडी गट-यमुनाबाई इंद्रराज सपकाळे (५१३). ग्रामपंचायत सर्वसाधारण गटातून एकमेव अपक्ष उमेदवार पल्लवी जितेंद्र देशमुख २६३ मतांनी विजयी झाल्या.

अपक्षाचा महाविकासला पाठिंबा

महाविकास आघाडीचे ११ उमेदवार विजयी झाले आहेत. त्यांना पूर्ण बहुमत मिळाले आहे. ग्रामपंचात सर्वसाधारण गटातून विजयी झालेल्या पल्लवी देशमुख यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्याचे आघाडीप्रमुख गुलाबराव देवकर यांनी सांगितले.

देवकरांचे आगमन आणि जल्लोष

महाविकास आघाडीला बहुमत मिळाल्यानंतर गुलाबराव देवकर यांचे मतमोजणी केंद्रावर आगमन झाले. त्यांचे फटाक्यांची आतिषबाजी व गुलाल उधळून स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादी कॉंग्रेस सहकार आघाडीचे वाल्मीक पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, गजानन मालपुरे आदी उपस्थित होते.

Activists cheering after the results of market committee election on Sunday.
Dhule Market Committee Election : काँग्रेसप्रणीत शेतकरी पॅनल एकतर्फी विजयी; ‘रोडरोलर’ पंक्चर

फेरमतमोजणीत युतीचाच विजय

सेवा सहकारी गटातील विमुक्त जाती भटक्या जमाती युतीचे उमेदवार समाधान लहू धनगर तीन मतांनी विजयी झाले. त्यानंतर महाविकास आघाडीने पुन्हा फेरमतमोजणीची मागणी केली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ती मान्य केली आणि फेरमतमोजणी करण्यात आली. यातही त्यांचाच तीन मतांनी विजय झाला.

वडील, मुलगा संचालक

जळगाव बाजार समितीत वडील आणि मुलगा एकत्र संचालक होण्याची ही पहिलीच वेळ आहे. सेवा सहकारी सर्वसाधारण गटातून महाविकास आघाडीचे लक्ष्मण गंगाराम पाटील, तर त्यांचे चिरंजीव संदीप पाटील महाविकास आघाडीतर्फे व्यापारी गटातून विजयी झाले.

नवख्या अरुण पाटलांचा विजय

ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक गटातून राजकीय वारसा नसलेले नवखे, महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण पाटील यांनी पंकज पाटील यांचा पराभव केला. पंकज पाटील बाजार समितीचे विद्यमान संचालक, तसेच पालकमंत्र्याचे कट्टर समर्थक आहेत. त्यांच्या मातोश्री पंचायत समितीच्या सभापती होत्या.

Activists cheering after the results of market committee election on Sunday.
Sinnar Market Committee Election : ‘त्या’ 8 संस्थांचा मुद्दाच सिन्नर बाजार समितीत निर्णायक! वाजे गटाला लाभ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com