Jalgaon News : महापालिकेतर्फे जागा घेतली, पण स्वच्छतागृह बंद.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

for toilet in bahinabai chaudhari park global organization take place but toilet is closed till date jalgaon news

Jalgaon News : महापालिकेतर्फे जागा घेतली, पण स्वच्छतागृह बंद..

जळगाव : सामाजिक संस्थांतर्फे सामाजिक कार्याच्या नावाखाली शहरातील विविध भागांत जागा मिळविल्या जातात. मात्र, त्या ठिकाणी ते उपक्रम कायमस्वरूपी राबविले जात नाहीत, अशी जागा ‘ग्लोबल’ संस्थेने बहिणाबाई चौधरी (bahinabai chaudhari park) उद्यानात स्वच्छतागृहासाठी घेतली. मात्र, आज हे स्वच्छतागृह बंद आहे. (for toilet in bahinabai chaudhari park global organization take place but toilet is closed till date jalgaon news)

सामाजिक संस्था उपक्रम राबविण्यासाठी महापालिकेत शहरातील विविध भागांतील जागेची मागणी करतात. आम्ही उपक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने राबविणार आहोत, असे सांगितले जाते. तसेच त्यांच्या प्रस्तावात आकर्षक चित्र दाखविले जाते.

महापालिकेच्या महासभेत प्रस्ताव ठेवले जातात. त्यानंतर त्याला मंजुरी दिली जाते. संस्था प्रकल्प उभारतात. मात्र, काही दिवसांनी ते बंद केले जातात. मात्र जागा त्या संस्थाकडेच कायम राहतात. अशा अनेक संस्थांना उद्याने व इतर भागांत जागा देण्यात आल्या आहेत. मात्र, त्याचा वापर होताना दिसत नाही.

शहरातील ग्लोबल संस्थेने महिला व पुरुषांसाठी अत्याधुनिक स्वच्छतागृह उभारण्यासाठी बहिणाबाई चौधरी उद्यानात जागेची मागणी केली. महापालिकेच्या एम. जे. कॉलेजच्या मार्गावर एका कार्नरला जागाही दिली. या संस्थेने त्या ठिकाणी चांगले स्वच्छतागृह उभारले आहे. मात्र, अद्याप ते बंदच आहे.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

सामजिक संस्था उपक्रम राबवीत नसतील, तर या जागा महापालिकेकडून का घेतल्या जातात, असा प्रश्‍न आहे. महापालिकेचे आरोग्य विभागाचे अधिकारी याकडे का लक्ष देत नाहीत? विशेष म्हणजे महापालिकेचे कार्यालयही याच बहिणाबाई चौधरी उद्यानात आहे.

त्यांनी याबाबत का तक्रार केली नाही? तसेच आपण दिलेल्या जागावर उपक्रम सुरू आहे की नाही, याची पाहणी अधिकारी का करीत नाहीत, असाही प्रश्‍न आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी स्वच्छतागृह सुरू का नाही, याची तपासणी करून संबधितांना तसे कळवावे, असे नागरिकांमध्ये बोलले जात आहे.