राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप वाघ कोरोना पॉझिटिव्ह

राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप वाघ कोरोना पॉझिटिव्ह

पाचोरा :  पाचोरा -भडगाव विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप वाघ यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याबाबत त्यांनी स्वतः समाज माध्यमातून माहिती दिली. संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहनही केले .मास्कचा वापर करावा, सुरक्षित अंतर ठेवावे, सॅनीटायझरचा वापर करावा, वेळोवेळी हात धुवावेत असेही आवाहन त्यांनी केले आहे.


दरम्यान गेल्या 11 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसची परिवार संवाद यात्रा पाचोरा येथे आली होती. त्यात जलसंपदा मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, महिला आघाडीच्या रूपाली चाकणकर, माजी आमदार मनीष जैन ,आमदार डाॅ सतीश पाटील, संजय गरुड यांचेसह राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये श्री. वाघ यांचाही सहभाग होता. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना थोडा खोकला जाणवू लागल्याने तसेच जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे काही पदाधिकारी कोरोना बाधीत झाल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com