Jalgaon News: भविष्यात सौर ऊर्जेला येणार ‘अच्छे दिन’; माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांचे मत

Jalgaon Janata Bank CEO Satish Nagmote welcoming former Union Minister Vijay Naval Patil. 'HR' Kapil Choubey of Neighbor Bank.
Jalgaon Janata Bank CEO Satish Nagmote welcoming former Union Minister Vijay Naval Patil. 'HR' Kapil Choubey of Neighbor Bank. esakal

Jalgaon News : निसर्ग ऊर्जा ही स्वस्तात मिळणारी ऊर्जा आहे. यासाठी जळगाव जनता सहकारी बँकेने जिल्ह्यात वॉटर हीटरचे १ हजार ५८० सोलर सिस्टिम बसवले आहेत. ही बाब अभिमानास्पद आहे. सौरऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी बँकेने एक पाऊल पुढे टाकत सौरऊर्जेसाठी कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणार आहेत. (Former Union Minister Vijay Naval Patil opinion that Acche Din will come for solar energy in future jalgaon news)

त्यामुळे भविष्यात सौरऊर्जा व पवन ऊर्जेला ‘अच्छे दिन’ येणार असल्याचे मत माजी केंद्रीय मंत्री तथा निसर्ग ऊर्जा उत्पादकांची संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय नवल पाटील यांनी व्यक्त केले. जळगाव जनता सहकारी बँकेला दिलेल्या सदिच्छा भेटीप्रसंगी ते बोलत होते.

जनता बँकेचे सीईओ सतीश नागमोते यांनी माजी मंत्री पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी जनता बँकेचे 'एचआर' कपिल चौबे, संस्थेचे मानद शिक्षण संचालक प्रा. सुनील गरुड, मुख्याध्यापक एन. एस. पाटील, मंगेश पाटील, आर. एस. सानप, डी. बी. वाल्हे, भटू मोरे आदी उपस्थित होते. माजी मंत्री पाटील यांनी बँकेचे सीईओ सतीश नागमोते यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

Jalgaon Janata Bank CEO Satish Nagmote welcoming former Union Minister Vijay Naval Patil. 'HR' Kapil Choubey of Neighbor Bank.
ABHA Card : आयुष्यमान भारत कार्ड नोंदणीत जळगाव जिल्हा तिसऱ्या स्थानी

वयाच्या ८२ व्या वर्षी जनजागृती

मोठ्या शहरातील अनेक उंच इमारतींवर वाऱ्याचा वेग थोडा जास्त असतो, अशा ठिकाणी रूट टॉप सोलर एनर्जीबरोबरच पवन ऊर्जा निर्मितीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, यासाठी माजी मंत्री विजय पाटील यांनी वयाच्या ८२ व्या वर्षी निसर्ग ऊर्जा अर्थात सौरऊर्जा, पवन ऊर्जा यांचा प्रचार व प्रसारासाठी स्वतः पुढाकार घेतला आहे.

Jalgaon Janata Bank CEO Satish Nagmote welcoming former Union Minister Vijay Naval Patil. 'HR' Kapil Choubey of Neighbor Bank.
Jalgaon News: दिवाळीपूर्वी 54 हजार शेतकऱ्यांना मिळणार फळपीक विम्याचा लाभ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com