साडेचार हजार लिटर बायोडिझेल चोपड्यात जप्त | Jalgaon | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जळगाव : साडेचार हजार लिटर बायोडिझेल चोपड्यात जप्त

चोपडा : साडेचार हजार लिटर बायोडिझेल चोपड्यात जप्त

चोपडा : चोपडा- शिरपूर रस्त्यावरील न्यू द्वारकाधीश ढाब्याचा उजव्या बाजूला पत्री शेडमध्ये ४ हजार पाचशे लिटरचा बायो डिझेल सदृश्य विस्फोटक द्रव्यांचा अवैध साठा बुधवारी (ता. १७) दुपारी साडेतीनच्या सुमारास ग्रामीण पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात आढळून आला. यात रामजी जाधव (वय ३६, रा पंपनगर, लासूर, ता. चोपडा) याच्यासह चार लाख ९२ हजारांचा मुद्देमाल ग्रामीण पोलिसांनी जप्त केला आहे.

ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे, पोलिस कर्मचारी देविदास ईशी, संजय येदे, राजू महाजन, भरत नाईक, शिवाजी बाविस्कर, विनोद पाटील, सुनील कोळी यांनी केली.

चोपडा ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीत बुधवारी (ता. १७) दुपारी सव्वादोनच्या सुमारास प्रतिबंधित बायो डिझेलची अवैधरित्या साठवणूक व विक्री होत असल्याच्या मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ग्रामीण पोलिसांनी छापा टाकला असता पत्री शेडमध्ये अवैधरित्या प्रतिबंधित केलेल्या बायोडिझेलचा बेकायदेशीर साठा करुन विना परवाना वाहनामध्ये डिझेल विस्फोट द्रव्य किंवा बायोडिझेल विक्री करीत असल्याचे आढळून आले.

हेही वाचा: हिवाळी अधिवेशनाच्या तारखेवरुन गोंधळ! उपसचिवांचं पत्रक व्हायरल

शेडमध्ये जाधव रामजी सिंधव (वय ३६) वरील वर्णनाचे व किमतीचे सुमारे ४ हजार ५०० लिटर बायो डिझेल सदृश्य विस्फोटक द्रव्यांचा साठा करून शासनाने पडताळणी न केलेल्या मशिनच्या साहाय्याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बायो डिझेल विस्फोटक द्रव्याचा साठा एका ५ हजार लिटर मापाच्या प्लॅस्टिक टाकी व इतर साहित्य साधनांसह ४ लाख ९२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल बेकायदेशीर विनापरवाना स्वतःचे कब्जात बाळगून विक्री करताना आढळून आला व बायोडिझेल वाहनात विक्री करण्याचे शासनाने मनाई हुकूम जारी केले असताना बायोडिझेलचा साठा साठवणूक करून विक्री करण्याच्या उद्देशाने शासनाच्या आदेशाचे उलंघन केले म्हणून जाधव सिंधव याच्याविरुद्ध ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

loading image
go to top