Jalgaon Road Damage : दीडच वर्षांत चौपदरी महामार्गाची ‘वाट’; 7 किलोमीटर टप्प्यात खड्डेच खड्डे

The highway passing through the city, which was built a year and a half ago, is full of potholes.
The highway passing through the city, which was built a year and a half ago, is full of potholes. esakal

Jalgaon Road Damage : ‘चांद्रयान-३’च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर यान चंद्रावर उतरतानाचे मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत असताना, जळगाव शहरातील खड्ड्यांना त्यासाठी उपरोधिकपणे दाखविले जातेय.

अर्थात शहरात दोन वर्षांपूर्वीच झालेल्या चौपदरी महामार्गाची अवस्था चंद्राच्या पृष्ठभागावरील मोठ्या खड्ड्यांसारखीच आहे, हे वेगळे सांगायला नको.

भारतीय राष्ट्रीय महामार्गासारख्या देशात चौपदरी महामार्गांसह ‘एक्स्प्रेस-वे’चे जाळे विणणाऱ्या नंबर एक एजन्सीच्या माध्यमातून झालेल्या रस्त्याची ही अवस्था निश्‍चितच अपेक्षित नाही. (four lane highway is potholes in 7 km phases jalgaon news)

महामार्गावर खड्डे

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ च्या चौपदरीकरणात हा मार्ग जळगावला वळसा घालून बायपास गेल्यानंतर जळगाव शहरातील महामार्गाच्या चौपदरीकरणाचा मुद्दा उपस्थित झाला.

खोटेनगर ते कालिंकामाता चौक या सात किलोमीटर टप्प्यासाठी विशेष बाब म्हणून केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या महामार्गाच्या चौपदरीकरणास मंजुरी दिली आणि त्यासाठी ६९ कोटींच्या निधीची तरतूद केली. दीड वर्षापूर्वीच हा महामार्ग तयार झाला. मात्र, दीडच वर्षात या महामार्गावर खड्डेच खड्डे झाले आहेत.

एजन्सीला शोभेसे काम नाही

मुळात रस्त्याचे काम भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (न्हाई) नियंत्रणाखाली झाले. जांडू कन्स्ट्रक्शन ही मक्तेदार एजन्सी त्यासाठी नेमली. मात्र, देशभरात हजारो किलोमीटरचे दर्जेदार रस्ते बांधणाऱ्या ‘न्हाई’ने जळगावातील महामार्गाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले. राष्ट्रीय एजन्सीला शोभेल, असे हे काम झालेच नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

The highway passing through the city, which was built a year and a half ago, is full of potholes.
Cyber Crime News : सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ चिंताजनक; फेक अकाऊंट काढून बदनामी

गेल्या वर्षीच्या पावसातच हा रस्ता ठिकठिकाणी खचला व त्यात खड्डे झाले. त्यांची वरच्या वर डागडुजी झाल्यानंतर यंदाच्या मोसमात अत्यंत किरकोळ पाऊस झाला. तरीही रस्त्याची अक्षरश: चाळण झालीय.

खोटेनगर, दादावाडीसमोरील उड्डाणपूल, मानराज पार्क, शिवकॉलनी, आयटीआयसमोरील मार्ग, इच्छादेवी चौक व कालिंकामाता मंदिराजवळील मार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून, मुसळधार पाऊस नसताना महामार्गाची अवस्था एखाद्या ग्रामीण रस्त्यासारखी कशी झाली, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

देखभाल, दुरुस्तीच्या अटीचा उपयोग शून्य

रस्ते कामाचे कंत्राट देताना त्याची देखभाल-दुरुस्ती (defect & liability) संबंधित मक्तेदार एजन्सीवर असते. त्यासाठीही मुदत दिली जाते. शहरातून जाणाऱ्या महामार्गासाठी ही जबाबदारी जांडू कन्स्ट्रक्शनवर आहे.

The highway passing through the city, which was built a year and a half ago, is full of potholes.
Jalgaon News : ..अन् इथे ओशाळली माणुसकी! पोटच्या गोळ्याला विकणाऱ्या महिलेची रस्त्यावरच प्रसूती...

मात्र, देखभाल-दुरुस्तीची अट, असे काम केले तर काहीच उपयोगाचे राहत नाही. कारण संपूर्ण रस्त्याचे कामच निकृष्ट झाल्यानंतर मक्तेदार एजन्सी मुदतीपर्यंत, म्हणजे फार तर वर्ष-दीड वर्षे दुरुस्ती करून देईल. नंतर या महामार्गाच्या भवितव्य जळगावकरांसारखेच ‘खड्ड्या’त जाणार आहे.

महामार्गाचा मालक कोण?

महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण होईपर्यंत या रस्त्याची मालकी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे होती. त्यांचा मूळ महामार्ग जळगावला वळसा घालून (पाळधी ते तरसोद फाटा बायपास) गेला आहे. त्यामुळे या महामार्गाच्या मालकीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

महामार्ग महापालिका हद्दीत असला, तरी महापालिका आर्थिक कारणावरून त्याची जबाबदारी घेणारच नाही. ‘न्हाई’ने तो सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केल्याचे सांगितले जाते. मात्र, बांधकाम विभाग या रस्त्याची मालकी स्वीकारेल का? हाही प्रश्‍न आहे.

The highway passing through the city, which was built a year and a half ago, is full of potholes.
Stray Animal Problem : मोकाट जनावरांचे मालक कोण? अमळनेर पालिकेची यंत्रणा हतबल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com