Jalgaon Accident News : लग्नासाठी येणाऱ्या बापलेकाला ट्रॅक्टरची धडक; पित्याचा मृत्यू

Accident News
Accident Newsesakal

Jalgaon News : जळगावला नातेवाइकांच्या लग्नासाठी दुचाकीने येणाऱ्या बापलेकासह चौघांना ट्रॅक्टरने धडक दिली. ही घटना मंगळवारी (ता. १६) सावखेडा फाट्यावर घडली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला, तर तीन जण जखमी झाले. (Four people were hit by tractor jalgaon accident news)

ज्ञानेश्वर रामराव सपकाळे (वय ४१, रा. फुफनी, ता. जळगाव) असे मृताचे नाव आहे, तर त्यांचा मोठा मुलगा डिगंबर सपकाळे (वय १९), त्यांचे मित्र राजेंद्र सोनवणे (४८), नीलेश निकम (४५) जखमी झाले. जखमींवर जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ज्ञानेश्वर सपकाळे जळगावातील रिंग रोडवरील मंगल कार्यालयात नातेवाइकाच्या लग्नासाठी दुचाकीने फुफनी येथून येण्यासाठी निघाले. त्यांच्यासोबत दुचाकीवर मोठा मुलगा डिगंबर व दुसऱ्या दुचाकीवर राजेंद्र सोनवणे, नीलेश निकम निघाले होते. काही अंतरावर सावखेडा फाट्यावर भरधाव ट्रॅक्टरने दुचाकींना एकामागून एक जोरदार धडक दिली.

या अपघातात चौघेही रस्त्याच्या खाली फेकले गेले. यात ज्ञानेश्वर सपकाळे यांच्या डोक्याला व हाताला जबर मार लागल्याने ते जागीच ठार झाले, तर इतर तीन जण जखमी झाले. या अपघाताची माहिती गावात पोचली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Accident News
Jalgaon Crime : जारगावात अनधिकृत खतसाठा जप्त; कृषी विभागाच्या पथकाची धडक कारवाई

सावखेडा, किनोद गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याबाबत शांताराम निकम यांच्या तक्रारीवरून तालुका पोलिस ठाण्यात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला. सहाय्यक फौजदार अनिल फेगडे अधिक तपास करीत आहेत.

मंगल कार्यालय शोकमग्न

विवाह असल्याने ज्ञानेश्वर सपकाळे यांच्या पत्नी वंदना सकाळीच लग्नाच्या ठिकाणी पोचल्या होत्या. पती ज्ञानेश्वर व मुलगा डिगंबर यांची त्या वाट पाहत असतानाच अपघाताची वाईट बातमी कानावर पडली. ऐन लग्नाच्या धामधुमीत धावपळ उडून नातेवाइकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. मृत ज्ञानेश्वर सपकाळे यांच्यामागे तीन मुले, पत्नी व आई, असा परिवार आहे

Accident News
Jalgaon Online Fraud : यू-ट्यूब Subscriptionच्या नावे 3 लाखांचा गंडा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com