Latest Marathi News | पतंजली योगा प्रशिक्षणाच्या नावाखाली प्राचार्यांची सव्वा लाखात फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fraud Crime

Jalgaon Crime News : पतंजली योगा प्रशिक्षणाच्या नावाखाली प्राचार्यांची सव्वा लाखात फसवणूक

धरणगाव : फेसबुकवर पतंजली योगा प्रशिक्षणाच्या बनावट जाहिरातीच्या माध्यमातून धरणगावच्या प्राचार्यांची १ लाख १९ हजारांत फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलिस ठाण्यात दोन अनोळखी मोबाईलधारकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

येथील हेमइंदूनगरमधील रहिवाशी तथा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ किशोर मंगेश पाटील (वय ६०) यांना फेसबुकवर पंतजली योगपीठ ट्रस्ट युनिट २ हरिद्वार उत्तराखंड या संस्थेची योगासन आणि प्राणायामाच्या सात दिवसांच्या प्रशिक्षणाची जाहिरात दिसली. (Fraud of principals in Name of Patanjali yoga Training Jalgaon Crime News)

हेही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

हेही वाचा: Jalgaon News : अडीच हजार हेक्टर जमिन ओलिताखाली येणार

त्या जाहिरातीत प्रशिक्षणासाठी पंतजली योगपीठ ट्रस्ट युनिट २ खात्याचा क्रमांक १९०५१९०१९००५९६६५ टाकला होता. किशोर पाटील प्रशिक्षण करण्यास इच्छुक असल्यामुळे त्यांनी ‘फोन पे’द्वारे टप्प्याटप्प्याने एकूण १ लाख १९ हजार रुपये ७ ऑगस्टला दुपारी १.५९ व ८ डिसेंबरला दुपारी २.२७ च्या दरम्यान वेळोवेळी टाकले.

श्री. पाटील एप्रिल महिन्यात प्रशिक्षण घेणार होते. मात्र, त्यादरम्यान काही अडचण आल्यास पैसे परतीचे काय, याबाबत संपर्क साधल्यावर पैसे परत करण्यास टाळाटाळ व्हायला लागली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर किशोर पाटील यांनी पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्याशी संपर्क केला.

त्यांच्या मार्गदर्शनाने सायबर क्राईमला संपर्क केला. सायबर क्राईम विभागाने गतिमान हालचाली करून बनावट खाते असल्याचा संशय व्यक्त केला आहे. श्री. पाटील यांनी धरणगाव पोलिस ठाण्यात ९४३३२७३०७२ व ९७४८०६७०६९ या भ्रमणध्वनीधारकांविरुद्ध कायदेशीर तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक अमोल गुंजाळ तपास करीत आहेत.

हेही वाचा: Jalgaon News : पत्नी विरहातून नैराश्यग्रस्त पतीने मृत्युला कवटाळले

टॅग्स :Jalgaoncrimeyoga