Latest Marathi News | फटाके विक्रेत्याची अडीच लाखांची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cyber crime fraud news

Cyber Crime : फटाके विक्रेत्याची अडीच लाखांची फसवणूक

जळगाव : रामदास कॉलनीतील व्यापाऱ्याला फटाक्यांची ऑर्डर देण्याचा बहाणा करून दोन लाख ४१ हजार ५०० रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

धनंजय लक्ष्मण पाटील (वय ४८, रा. रामदास कॉलनी, आकाशवाणी चौक, जळगाव) यांना अनोळखी व्हॉट्सॲप क्रमांकावरून २० सप्टेंबरला शेखर माखाजी फटाके डीलर नावाने अज्ञात व्यक्तीने संपर्क केला. त्यांनी धनंजय पाटील यांना मोठ्या ऑर्डरचे आमिष दाखवत विश्वास संपादन केला. (Fraud of two half lakh with firecracker seller jalgaon cyber crime news)

हेही वाचा: Jalgaon : समस्या अधिक, पण विषय न मिळाल्याने महासभाच नाही!

फटक्यांच्या ऑर्डरसाठी कमी किमतीत माल मिळेल या अपेक्षेने त्यांनी ऑर्डर दिली. त्यानंतर धनंजय पाटील यांनी ऑनलाइन दोन लाख ४१ हजार ५०० रुपये संबंधित फटाके डीलरच्या खात्यात टाकले. फटाक्यांची ऑर्डर घेऊन दिलेल्या मुदतीत फटाके न मिळाल्याने धनंजय पाटील यांनी मंगळवारी २७ सप्टेंबरला जळगाव सायबर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे तपास करीत आहेत.

हेही वाचा: Jalgaon : बिबट्याचा 24 तासांत दुसरा हल्ला वासराचा पाडला फडशा

टॅग्स :Jalgaoncrime