Latest Marathi News | समस्या अधिक, पण विषय न मिळाल्याने महासभाच नाही! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jalgaon muncipal carporation

Jalgaon : समस्या अधिक, पण विषय न मिळाल्याने महासभाच नाही!

जळगाव : शहराबाबत कोणतेही विषयच नसल्यामुळे महापालिकेची या महिन्यात महासभा होण्याची शक्यता दुरावली आहे. शहरातील विकासकामे, तसेच विविध प्रश्‍नांवर महापालिकेची महासभा घेण्यात येते. दर महिन्यास एक महासभा घेण्यात यावी, असा नियम आहे.

महासभेसाठी नगरसेवकांकडून तसेच प्रशासनाकडून विषय महापौरांकडे दिले जातात. त्या विषयापुसार महापौर नगरसचिव विभागाकडे महासभा घेण्याची सूचना देत असतात. या सभेबाबत प्रशासन तसेच महापौर यांच्यातर्फे नियोजन केले जाते. महापालिकेची महासभा गेल्या ऑगस्टमध्ये १० तारखेला झाली होती; परंतु तब्बल आज दीड महिन्यानंतरही महासभा घेण्यासाठी विषयच आलेले नसल्यामुळे महिना संपण्यास अवघे दोन दिवस बाकी असतानाही महासभा घेण्याचे कोणतेही नियोजन नाही.(jalgaon municipal corporation mahasabha jalgaon news)

हेही वाचा: Jalgaon : बिबट्याचा 24 तासांत दुसरा हल्ला वासराचा पाडला फडशा

जळगाव शहरात अनेक समस्या आहेत. महापालिकेत स्थायी समितीही नाही अशा स्थितीत सर्व विषय महासभेत येणे गरजेचे आहे. मग महासभेसाठी विषय का उपलब्ध होत नाही, असा प्रश्‍न निर्माण होत आहे. नगरसेवक आपल्या प्रभागाच्या प्रश्‍नाबाबत सतर्क नाहीत काय, असा प्रश्‍नही आता निर्माण होत आहे.

हेही वाचा: Jalgaon : प्रौढाकडून अल्पवयीन चिमुकलीचा विनयभंग