Jalgaon : बिबट्याचा 24 तासांत दुसरा हल्ला वासराचा पाडला फडशा

A leopard killed a cow
A leopard killed a cowesakal

मेहुणबारे (ता. चाळीसगाव): वरखेडे (ता. चाळीसगाव) येथे बिबट्याने एका गायीचा फडशा पाडल्याच्या घटनेला चोवीस तास उलटत नाही, तोच पुन्हा एका वासराचा फडशा पाडल्याची घटना वरखेडे-लोंढे रस्त्यालगत शेतशिवारात घडली. बिबट्याचे हल्ले दिवसेंदिवस वाढतच असून, शेतमजूर व शेतकऱ्यांमध्ये भीती पसरली आहे. यामुळे वन विभागाने लवकरात लवकर पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

वरखेडे (ता. चाळीसगाव) येथे सोमवारी (ता. २६) बिबट्याने गायीचा फडशा पाडल्याची घटना ताजी असताना मंगळवारी (ता. २७) सकाळी वरखेडे-लोंढे रस्त्यालगत माळरानावरील अजबसिंग भिमसिंग पवार यांच्या शेतात बिबट्याने वासराचा फडशा पाडला. अजबसिंग पवार यांनी गावातील पोलिस पाटील रोहिदास जगताप यांना कळविले. श्री. जगताप यांनी या घटनेची माहिती वन विभागाला दिली. (Second leopard attack in 24 hours Calf mauled Jalgaon news)

A leopard killed a cow
Jalgaon : प्रौढाकडून अल्पवयीन चिमुकलीचा विनयभंग

वन विभागाकडून पंचनामा

या घटनेची माहिती वन विभागाला मिळताच वनरक्षक श्रीराम राजपूत यांनी पाहणी करून पंचनामा केला. या ठिकाणी बिबट्याने वासराचा नरडा फोडून मान तोडण्याचा प्रयत्न केल्याचे देखील प्राथमिक दिसून आले. ज्या ठिकाणी वासरांवर हल्ला झाला, त्या ठिकाणी बिबट्याचे पायाचे ठसे देखील मिळून आले आहेत. या ठिकाणी पशुसंवर्धन अधिकारी ज्योती माळी यांनी विच्छेदन केले.

तातडीने मदत द्यावी

बिबट्याकडून सध्या पशुधनावर मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत. मात्र हल्ला झाल्यानंतर मदत तातडीने मिळत नसल्याचे शेतकरी नाराज आहेत. वन विभागाने शेतकऱ्याला तातडीने मदत द्यावी, अशी मागणी केली जात आहे. दरम्यान, यासंदर्भात वनपरीक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे यांना विचारले असता त्यांनी सांगितले, की आजचा झालेला हल्ला व काल गायीवर झालेला हल्ला यातील बिबट्याचे येण्या-जाण्याचे अंतर खूप जास्त आहे. लवकरच या भागात पिंजरा लावला जाईल.

लोंढ्यात लावला पिंजरा

लोंढे (ता. चाळीसगाव) शिवारातही बिबट्याने दोन वासरांवर हल्ले करत एका गायीचा फडशा पाडला होता. या ठिकाणी घटनांचे गांभीर्य ओळखून वन विभागाने चेतन भोसले यांच्या शेतात पिंजरा ठेवण्यात आला आहे. या पिंजऱ्यात बिबट्या अडकावा म्हणून बोकड ठेवण्यात आला आहे. या ठिकाणी लवकरच ट्रँप कॅमेरे लावण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाने दिली.

A leopard killed a cow
Jalgaon : शॉर्टसर्कीटमुळे एमआयडीसीतील कंपनीला आग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com