Latest Marathi News | खुनाच्या गुन्ह्यातील फरारी संशयित महिलेस अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Jalgaon Crime Update : खुनाच्या गुन्ह्यातील फरारी संशयित महिलेस अटक

जळगाव : फटाके फोडण्याच्या कारणातून तांबापुरात झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील फरारी संशयित महिलेस एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोधपथकाने अटक केली असून, सतकौरसिंग बावरी असे तिचे नाव आहे. संजयसिंग टाक या तरुणाच्या हत्येप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात यापूर्वी तिघांना अटक करण्यात आली आहे.

गुन्हा घडल्यापासून फरारी संशयित आरोपी सतकौर जगदीशसिंग बावरी ही मनमाड येथे लपून असल्याच्या गुप्त माहितीवरून गुन्हे शोधपथकातील सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, विकास सातदिवे व महिला सपना ऐरगुंटला आदींच्या पथकाने मनमाड गाठत स्थानिक पोलिसांच्या मदतीने तिला अटक केली. (Fugitive woman suspect in crime of murder arrested Jalgaon Crime News)

हेही वाचा: Jalgaon Crime Update : वीजचोरी विरोधात धडक कारवाई; 51 घरांमध्ये आढळली वीजचोरी

मनमाड शहरातील मोठे गुरुद्वारा भागात ती लपली होती. पोलिसपथक आपल्या मागावर असल्याची चाहूल लागताच तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पथकाने पाठलाग करत तिला ताब्यात घेत अटक केली.

पती-पत्नीसह मुलगाही अटकेत

अटकेतील मोहनसिंग बावरी, मोनुसिंग जगदीश बावरी, जगदीश हरिसिंग बावरी व सतकौर जगदीशसिंग बावरी या सर्वांना न्यायालयात हजर केले असता ५ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. खुनाच्या गुन्ह्यातील पितापुत्रापाठोपाठ कुटुंबातील महिला सतकौर हिलाही अटक झाल्याने संपूर्ण कुटुंबच कारागृहात पोचले आहे.

हेही वाचा: Jalgaon : गोळीबार प्रकरणातील संशयितांची मिरवणूक

टॅग्स :JalgaoncrimeArrestedWoman