Girish Mahajan, Khadse
Girish Mahajan, Khadseesakal

Girish Mahajan News : बेकायदेशीर कामांमुळेच खडसेंच्या मालमत्तेवर टांच : गिरीश महाजन

महसूलमंत्री असूनही त्यांनी शासनाच्या तिजोरीवर दरोडा टाकला असून त्यामुळेच त्यांना १३७ कोटींचा दंड होऊन मालमत्ता जप्त होत आहेत, असा आरोप मंत्री गिरीश महाजन यांनी केला.

जळगाव : राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी मुरुम पुरवून कोट्यवधी रुपयांची कमाई केली, मात्र एकनाथ खडसेंनी रॉयल्टी भरली नाही.

महसूलमंत्री असूनही त्यांनी शासनाच्या तिजोरीवर दरोडा टाकला असून त्यामुळेच त्यांना १३७ कोटींचा दंड होऊन मालमत्ता जप्त होत आहेत, असा आरोप मंत्री गिरीश महाजन यांनी केला. (Girish Mahajan statement Khadse property damage due to illegal activities jalgaon political news)

भाजप कार्यालयात पत्रकार परिषदेनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी खडसेंवर टीका केली. श्री. महाजन म्हणाले, ज्यांच्याकडे सात खात्यांचा कारभार होता, जे स्वत:ला ज्येष्ठ नेते म्हणतात त्या खडसेंनी अशाप्रकारे शासनाची रॉयल्टी बुडवली.

कोट्यवधींचा मुरुम महामार्ग विभागाला दिला, पण एक रुपयाही रॉयल्टी भरली नाही, म्हणून त्यांना १३७ कोटींचा दंड झाला. शासनाची देणी असताना निवडणूक लढवता येत नाही, ही बाबही महाजन यांनी लक्षात आणून दिली.

स्वत: बेकायदेशीर कामे करायची आणि फडणवीस व अन्य नेत्यांवर आरोप करायचे ही त्यांची शैली आहे. भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणातही त्यांनी रेडीरेकनरनुसार ३० कोटींची किंमत असलेली जमीन अवघ्या ३ कोटींत घेतली.

त्यामुळे त्यांच्या गरीब जावयास जेलमध्ये जावे लागले. माझ्यामुळे पक्ष, मी पक्षासाठी एवढं केलं, असे खडसे नेहमी म्हणतात. पण, राष्ट्रवादीत गेल्यानंतर त्यांना त्यांच्या गावची ग्रामपंचायतही राखता आली नाही.

Girish Mahajan, Khadse
Goda Mahaarti : गोदाआरतीचा प्रस्ताव 11 कोटीवर; मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून आढावा

जिल्हा बँक, दूध संघ, सर्वच गेले.. ते जर एवढे लोकनेते आहेत, तर त्यांनी लोकसभा निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हानही महाजन यांनी दिले. दरम्यान यासंदर्भात श्री. खडसेंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.

उल्हासनगरच्या पोलिस ठाण्यातील घटना धक्कादायक

उल्हासनगर येथील पोलिस ठाण्यात भाजप आमदाराने शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यावर केलेल्या गोळीबाराची घटना धक्कादायक आहे. ते आमदार व शिंदे गटाचे पदाधिकारी माझे मित्र आहेत. दोघांमध्ये व्यक्तिगत वाद असून त्याला पक्षीय वादाचे स्वरुप कुणी देऊ नये.

गायकवाड एवढे पॅनिक होऊन टोकाचे पाऊल का उचलले? हे आमच्यासाठीही धक्कादायक आहे. त्यांच्यावर कारवाईसंदर्भात बोलताना महाजन यांनी पक्षाचे नेतृत्व त्यासंबंधी निर्णय घेईल, असे स्पष्ट केले.

Girish Mahajan, Khadse
Jalgaon Police Transfer: पोलिस अधीक्षकपदाची सूत्रे रेड्डींनी स्वीकारली! शुभेच्छांसह एम. राजकुमार यांना निरोप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com