Girish Mahajan : खडसेंची चोरी उघड झाली आहे; ते उगाच आमच्या नावाने खडे फोडतात : गिरीश महाजन

Minister Girish Mahajan
Minister Girish Mahajanesakal

Girish Mahajan : मुक्ताईनगरातील गौणखनिज प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी एकनाथ खडसे यांच्यासह कुंटूबातील सदस्यांना १३७ कोटी रूपयांची नोटीस बजावली आहे. त्यामुळे त्यांनी केलेली चोरी उघड झाली आहे.

आता त्यांनी त्याचे उत्तर द्यावे उगाच आमच्या नावाने खडे फोडू नयेत असे मत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले. ( girish mahajan statement of about eknath khadse Minor Mineral Case in Muktainagar jalgaon news )

जामनेर (जि.जळगाव) येथे विविध विकास कामाच्या भूमीपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.

श्री. महाजन म्हणाले, की मुक्ताईनगरातील गौण खनिजाची रॉयल्टी न भरल्या प्रकरणी त्या ठिकाणचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत प्रश्‍न उपस्थित केला होता. त्यांनी एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार एसआयटीतर्फे चौकशी करण्यात आली.

त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना गौण खनिज काढून रॉयल्टी न भरल्याप्रकरणी १३७ कोटी रूपयांची नोटीस बजावली आहे. एकनाथ खडसे यांनी त्या ठिकाणी जमीन खरेदी केली, त्या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू होते. त्या जमिनीवर असलेला डोंगर त्यांनी फोडला. रस्त्याच्या कामासाठी तो मुरूम दिला. परंतु त्यांची रॉयल्टी कुठेही भरलीच नाही.

त्यामुळे एसआयटी चौकशी होवून त्यांना १३७ कोटी रुपये दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे आता खडसे यांनी कुठे गेला तो माल, रॉयल्टी का भरली नाही? याचे उत्तर द्यावे. परंतु नोटीसला अद्याप कोणतेही उत्तर त्यांनी दिले नसल्याचे देखील श्री. महाजन यांनी सांगितले.

Minister Girish Mahajan
Girish Mahajan : अजितदादा खरंच नाराज? महाजनांनी सांगितलं मंत्रिमंडळाच्या बैठकीला अनुपस्थित राहण्याचं 'हे' कारण

एकनाथ खडसे म्हणतात मी स्वच्छ आहे, मी एक रूपया कुणाचाही खात नाही, त्यामुळे त्यांनीच आता उत्तर द्यावे हे गौण खनिज कुठे गेले ?एवढा मोठा डोंगर पोखरून उंदीर नाही घेऊन गेले ? याप्रकरणी एकनाथ खडसे यांना आगोदर शोकॉज नोटीसही दिली गेली होती. मात्र त्यांनी त्याचे उत्तरच दिले नाही. चोऱ्या खडसे करतील आणि आमच्या नावाने ते खडे फोडत असतात. भोसरी जमीन खरेदी प्रकरणात सर्व उलटे सुलटे प्रयोग तुम्ही केले.

दोनशे कोटीची जमीन तुम्ही हडप केली, तीस कोटी रेडीरेकनर असताना तीन कोटीत खरेदी केली आणि आम्हाला दोष देता. त्यामुळे त्यांनी आमच्यावर तोंडसुख घेण्यापेक्षा कागदोपत्री हे सिद्ध करावे यातच त्यांचे भले आहे. एखाद्या शेतकऱ्यांने एखाद्या ठिकाणाहून दोन तीन ब्रास मुरूम काढला तर त्याला दंड आकारला जातो.

खडसे यांनी १३७ कोटीचा माल चोरून घेवून गेले आणि परत टार्गेट करता. असेही तेच म्हणता. परंतु आता त्यांनी आता चोरी केली नाही हे सिद्ध करावे. आम्ही माल काढला नाही, उगाच आमच्या नावाने खडे फोडू नका असा टोलाही श्री. खडसे यांना श्री. महाजन यांनी लावला.

संजय पवारांचा रावेरचा दावा योग्य

राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी रावेर लोकसभा मतदार संघावर दावा केला आहे. याबाबत बोलताना गिरीश महाजन म्हणाले, की राज्यात आमची तीन पक्षाची युती आहे. त्यामुळे तिन्ही पक्ष दावा करणार आहेत. त्यांचा दावाही योग्य आहे. ज्यावेळी जागा वाटप होईल. त्यावेळी त्याबाबत निर्णय घेण्यात येईल.

Minister Girish Mahajan
Girish Mahajan News : जळगावची कामगिरी कल्पनेपलीकडची : गिरीश महाजन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com