Girish Mahajan on Eknath Khadse: एकीकडी ‘लक्षवेधी’ मांडायची, दुसरीकडे धमकी द्यायची; महाजनांचा खडसेंना टोला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Girish mahajan vs Eknath Khadse

Girish Mahajan on Eknath Khadse: एकीकडी ‘लक्षवेधी’ मांडायची, दुसरीकडे धमकी द्यायची; महाजनांचा खडसेंना टोला

जळगाव : आमदार खडसे यांनी जळगाव जिल्ह्यातील अवैध धंदे, मद्य विक्रीबाबत अधिवेशनात ‘लक्षवेधी’ मांडली. पोलिसांनी मुक्ताईनगर तालुक्यातून अवैध धंदे करणाऱ्यांना पकडून आणले. त्यावर पोलिसांना श्री. खडसे यांनी तत्काळ फोन करून, ‘तुम्ही आमच्या माणसांना पकडले आहे’, (girish Mahajan trolls eknath Khadse at press conference jalgaon political news)

असे विचारत त्यांच्यावर दबाब टाकला. म्हणजे एकीकडे अवैध धंद्यावरून लक्षवेधी मांडायची आणि पोलिसांनी कारवाई केली, की त्यांना फोनवरून धमकी द्यायची, हा कोणता प्रकार आहे? हे कसले लोकप्रतिनिधी आहेत.

खडसे यांचे पितळ उघडे पडले आहे, असा टोला ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांना लगावला. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरणानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

कापसाबाबत सकारात्मक निर्णय

कापसाच्या दराबाबत मंत्री महाजन म्हणाले, की कापसाला दर खरोखरच कमी मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर कापसाचा दर ठरतो. शेतकऱ्यांना भाव मिळत नसल्याचे चित्र आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाला मागणी नाही.

तरीही राज्य शासन अधिवेशन काळात कापसाच्या दराबाबत सकारात्मक निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करेल. सिलिंडर व इतर बाबींचा दरही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर अवलंबून असतात.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

कसब्यातील पोटनिवडणुकीत पराजयाबाबत मंत्री महाजन म्हणाले, की निसटता विजय मिळाला, म्हणून मोठा विजय मिळाला, असे नाही.

‘काय होताय तू... काय झालास तू’?

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाविषयी मंत्री महाजन म्हणाले, की शिवसेनेची गत आता ‘काय होतास तू... काय झालास तू?’, अशी झाली आहे. शिवसेना पक्ष गेला, चिन्ह गेले. यामुळे ठाकरे काहीही बोलताहेत.

जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा कोरोनाचे कारण सांगून घरात बसून होते. तेव्हा महागाई दिसली नाही. आता महागाईविरोधात ओरडत फिरताहेत. ते ‘वाचाळवीर’ आहेत. त्यांना शिवसेनेने पक्षातून ढकले आहे.

आता शिवसेना शिंदे गटाची आहे. चिन्हही त्यांना मिळाले आहे. ४० आमदार त्यांना सोडून गेले. त्यांना शिवसेनेतून काढून टाकले आहे. यामुळे त्यांचा तोल यापुढील काळात अजून सुटेल.