
जळगाव/जामनेर : बंजारा समाजाचे मूळ सनातनी हिंदू समाज असल्याचे विधान मुरारीबापू यांनी केले.अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा व लबाना नायकडा समाज कुंभाच्या तिसऱ्या दिवशी धर्मसभेत ते बोलत होते. व्यासपीठावर पूज्य रामप्रसादजी, वेदशास्त्री साहेबराव शास्त्री, पू. संग्रामसिंह महाराज, धनसिंग नायक (तेलंगाणा), पू. सिद्धलिंगजी महाराज, पू. बाबूसिंगजी महाराज, श्यामचैतन्य महाराज, स्वामी अभयानंदजी महाराज, स्वामी प्रणवानंदजी महाराज, पू. गोपालचैतन्य महाराज, रघुमुनुजी महाराज उपस्थित होते.
वेदशास्त्री साहेबराव शास्त्री यांनी वैदिक सनातन धर्म अनादी आहे. गोर बंजारा हिंदू धर्माची प्रमुख शाखा आहे. गो-रक्षक, गो-सेवक आणि गो-पालन करणारे गोर बंजारा आहेत. शास्त्रातील युद्धवीर, दयावीर, धर्मवीर आणि दानवीर हे सर्वजण गोरबंजारा समाजात आहेत. ‘हम हिंदू थे, हिंदू है और हिंदूही रहेंगे’, असे आवाहन त्यांनी शेवटी केले. (Godri Kumbh Dharma Sabha Morari Bapu stated that origin of Banjara society is orthodox Hindu society Jalgaon News)
संग्रामसिंग महाराज यांनी बंजारा धर्म सर्वव्यापी, सनातन हिंदू आहे, असे सांगितले. थानसिंग यांनी ‘कट गये हिंदू धर्म बचाने के लिए’, असे सांगत धर्म सोडू नका, असे आवाहन केले.
स्वामी प्रणवानंदजी यांनी गोद्रीतील कुंभ हिंदू गोर बंजारा समाजाचा कुंभ आहे. चौदाशे वर्षांपूर्वी इस्लाम, दोन हजार वर्षांपूर्वी इसाई धर्म आला. हे दोन्ही धर्म सनातन नाहीत, असे म्हटले.
धर्मांतरविरोधी कायदा लागू करण्याचा ठराव
जळगाव : संत श्यामचैतन्य महाराजांनी धर्मसभेत दुसरा प्रस्ताव ठेवला. त्यात स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांत ख्रिश्चनांची संख्या १० पट वाढली आहे. त्यास धर्मांतरण हेच कारण आहे. ख्रिस्ती धर्मांतराच्या द्रृष्टचक्राचा हा समाज शिकार होत आहे. ५ राज्यांतील ११ हजार तांड्यापैकी ३५०० तांड्यामध्ये चर्च दिसत आहेत.
कर्नाटक आणि मध्य प्रदेश सरकारद्वारे धर्मांतरविरोधी कायदा लागू केला आहे. असे कायदे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यात त्वरित लागू करावेत, यासंबंधी प्रस्ताव धर्मसभेत पारित करण्यात आला.
रघुमुनी महाराजांनी आपल्या मार्गदर्शनात समाज जोडण्यासाठी हा कुंभ आहे. बंजारा समाज हिंदू आणि सनातन होते व राहतील. तुम्ही महादेवाचे वंशज आहेत, असे सांगितले.
२०२४ मध्ये रामकथा करणार
मुरारी बापू यांनी आपल्या उपदेशात सनातन मूल्यांना पकडून ठेवावे. सनातन धर्माची सेवा करा. सनातन धर्म हा नष्ट होणारा धर्म नाही. ज्याप्रमाणे आपण घर सोडून बाहेर घेल्यावर धूळ होते. त्याचप्रमाणे वेद, गीता, उपनिषद, गुरुग्रंथ साहेबसारख्या ग्रंथापासून दूर गेल्यामुळे हिंदू सामाजाचे धर्मांतरण वाढते. बंजारा हे हिंदूच असून, २०२४ ला रामकथा करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.