
सोने, वाहनांचा बाजार तेजीत; कोट्यवधींची उलाढाल
जळगाव : साडेतीन शुभमुहूर्तापैकी पूर्ण एक असलेला अक्षय तृतीयेचा (Akshay Tritiya) मुहूर्त साधत आज अनेकांनी नवीन घरात प्रवेश केला. काहींनी सोने (Gold) खरेदीवर तर काहींनी नवीन दुचाकी (Two Wheeler) , चारचाकी गाडी (Four Wheeler) घेण्याचा मुहूर्त साधला. अक्षय तृतीया हा पितरांचा सण. यादिवशी पितरांच्या नावाने घागर पूजन करून त्यांना पुरणपोळी (Puranpoli), आंब्याचा रसाचा नैवेद्य दाखविण्यात आला. (Gold, automotive market boom Turnover of crores on occassion Akshay Tritiya Jalgaon News)
साडेतीन मुहर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधत अनेकांनी सोने, दुचाकी, चारचाकी वाहने, इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी केल्या. सर्वाधिक उलाढाल सोने विक्रीत झाली आहे. सुमारे आठ ते दहा किलो सोने विक्री झाल्याचा अंदाज सराफ व्यावसायिकांचा आहे. त्यातून सुमारे पन्नास कोटींची उलाढाल झाली आहे.
सराफ बाजारात सकाळी अकरा ते दोन दरम्यान गर्दी दिसून आली. दुपारी शांतता होती. सायंकाळी सहानंतर पुन्हा विविध शोरूममध्ये सोने खरेदीसाठी गर्दी वाढल्याचे चित्र होते. इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये टीव्ही, फ्रिज, मोबाईल, मिक्सर, कुकर, पंखे, एसी, होम थिएटर आदी वस्तूंना मागणी होती. पंकज ऑटो, सातपुडा ऑटोमोबाईल, आदित्य होंडा, मानराज मोटर्स आदी दुचाकी व चारचाकी वाहनांच्या शोरूम मध्ये गर्दी झाली होती.
आकडे बोलतात..
बाजारपेठ प्रकार---उलाढाल
सोने--५० कोटी
इलेक्ट्रॉनिक वस्तू --१ कोटी
दुचाकी--६००(वाहने)----६.५ कोटी
चारचाकी--११० (वाहने)--८.४ कोटी
हेही वाचा: धार्मिकनगरीतील ‘भोंगा’यण; ‘भोंगा लावण्याबद्दल मी काय बोलावे?’ : राज्यपाल
"अक्षय तृतीयेला सोन्याचे दागिने घेण्याकडे गृहिणींचा कल होता. फॅन्सी, लाईट वेटेड दागिने आमच्याकडे उपलब्ध आहे. सोने खरेदीचा हा शुभमुहूर्त असल्याने ग्राहकांचा चांगला प्रतिसाद होता." -मनोहर पाटील, जनसंपर्क अधिकारी आर. सी. बाफना ज्वेलर्स, जळगाव
"दुचाकी वाहनांच्या विक्रीला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला. गुढीपाडव्यापेक्षा आता गर्दी कमी होती. आगामी काळात विविध परीक्षांचे निकाल आहे. तेव्हा दुचाकींची मागणी वाढेल."
- योगेश चौधरी, संचालक पंकज ऑटो
"आमच्या शोरूममधून ३३ चारचाकी गाड्यांची विक्री झाली. तिनशे गाड्यांचे आरक्षण झाले होते. चारचाकींचा पुरवठा झालेला नसल्याने वाहनांची डिलेव्हरी करता आली नाही. लवकरच बुकिंग केलेल्या गाड्यांचे वितरण होईल."
- राजेश निकुंभ, व्यवस्थापक मानराज मोटर्स
हेही वाचा: आदिमायेच्या दरबारी हापुस आंब्यांची मनमोहक आरास
Web Title: Gold Automotive Market Boom Turnover Of Crores On Occassion Akshay Tritiya Jalgaon News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..