Latest Marathi News | जेष्ठ नागरीकाचा धावत्या रेल्वेखाली मृत्यु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Death News

Jalgaon Crime News : जेष्ठ नागरीकाचा धावत्या रेल्वेखाली मृत्यु

जळगाव : रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत एकाने आत्महत्या केली. त्याचा मृतदेह म्हसावद ते बोरनारदरम्यान रेल्वे रूळावर आढळून आला. राजेंद्र पंडित पाथरवट (वय ५५, रा. पाथरी, ता. जळगाव) असे मृताचे नाव आहे.

राजेंद्र पाथरवट गावाजवळील एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करून कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. शनिवारी (ता. १२) सकाळी अकराच्या सुमारास ते घरात कोणाला काहीही एक न सांगता घरातून निघून गेले. घरच्यांना ते कामावर गेले असावेत, असे वाटले. (Senior citizen dies under running train Jalgaon News)

हेही वाचा: Jalgaon Crime Update : रिक्षातील भामट्यांनी खिसा कापला

रात्री पाथरवट घरी परतले नाहीत. रविवारी सकाळी त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा गावात शोध घेतला असता, त्यांना म्हसावद ते बोरनारदरम्यान अनोळखी व्यक्तीच्या आत्महत्येची माहिती मिळाली.

काही ग्रामस्थांनी त्यांचा मुलगा चेतन याला सोबत घेऊन शासकीय रुग्णालय गाठले. मुलाने वडिलांची चप्पल आणि अंगातील शर्टावरून ओळख पटविली. याबाबत एमआयडीसी पोलिसांत आकस्किमक मृत्यूची नोंद झाली आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, चार मुली, मुलगा, जावई असा परिवार आहे.

हेही वाचा: Prashant Kumar Yelai : रस्ते कामाच्या दर्जाबाबत तडजोड नाही ; मक्तेदारांना ताकीद