अच्छा गुलाबराव! नाम सुना है; गुलाबराव पाटलांचे राज्यपालांकडून कौतुक

‘अच्छा, अच्छा गुलाबराव! नाम सुना है।’ अशा शब्दांत राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे कौतुक
Governor Bhagat Singh Koshyari Appreciation Gulabrao Patil
Governor Bhagat Singh Koshyari Appreciation Gulabrao Patilsakal

जळगाव : ‘अच्छा, अच्छा गुलाबराव! नाम सुना है।’ अशा शब्दांत राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे कौतुक केले.

राज्यपाल कोश्‍यारी दोन दिवसांच्या जळगाव दौऱ्यावर रविवारी (ता. २७) जळगावात दाखल झाले. औरंगाबादहून विमानाने ते जळगाव विमानतळावर सायंकाळी सहाला पोचले. पालकमंत्री पाटील यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या वेळी श्री. पाटील यांनी ‘मैं पालकमंत्री गुलाबराव पाटील’ अशी स्वत:ची ओळख करून दिली. त्या वेळी राज्यपाल म्हणाले, ‘‘अच्छा... अच्छा गुलाबराव! नाम सुना है।’’ आमदार सुरेश भोळे यांनी राज्यपालांना कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांचे पुस्तक भेट दिले.

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विद्यापीठाचे प्र.कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन, आमदार चंदुलाल पटेल, महापौर जयश्री महाजन, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, जैन इरिगेशनचे अतुल जैन यांनी त्यांचे स्वागत केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com