Jalgaon News : पोलिसाची कॉलर पकडणाऱ्या आरोपीस 5 वर्षांची शिक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Punishment to criminal

Jalgaon News : पोलिसाची कॉलर पकडणाऱ्या आरोपीस 5 वर्षांची शिक्षा

अमळनेर : मतदान केंद्रावर दारूच्या नशेत हुज्जत घालणाऱ्याला मज्जाव करण्यास गेलेल्या पोलिसाची कॉलर पकडून शिवीगाळ करणाऱ्या आरोपीस अमळनेर जिल्हा न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

हातेड बुद्रुक (ता. चोपडा) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत २१ ऑक्टोबर २०१९ मतदान सुरू होते. त्या ठिकाणी आरोपी शरद खंडू रोकडे हा दारूच्या नशेत मतदान करण्यासाठी आला. परंतु त्याच्याकडे मतदान कार्ड नसल्याने त्यास मतदान अधिकाऱ्यांनी मतदान कार्ड घेऊन ये व मतदान कर असे सांगितले.

मात्र तो तेथील अधिकाऱ्यांशी हुज्जत घालू लागला व फोन लावून बायको व इतर नागरिकांना बोलावून घेतल्याने वाद वाढले होते. मतदान केंद्राध्यक्षांनी त्या ठिकाणी नेमणुकीस असलेले पोलिस कर्मचारी रमेश खोपडे वाद मिटविण्यासाठी आले असता त्यांच्याशी हुज्जत घालून शिवीगाळ करू लागला. (Grabbing the policeman collar Accused sentenced to five years Jalgaon News)

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

पोलिसाची कॉलर पकडणाऱ्या आरोपीस पाच वर्षांची शिक्षात्यांच्या गणवेशाची ओढाताण करून कॉलर पकडली. याबाबत चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्यात एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले होते. त्यात फिर्यादी रमेश खोपडे व महिला पोलिस शीतल लोणे यांची साक्ष महत्त्वाची ठरली.

खटल्याचा तपास पोलिस निरीक्षक संदीप अराक व तत्कालीन उपविभागीय अधिकारी सौरभ अग्रवाल यांनी केला. जिल्हा न्यायाधीश पी. आर. चौधरी यांनी आरोपीस शासकीय कामात अडथडा निर्माण करणे, मतदान केंद्र व शासकीय कर्मचाऱ्यांशी बेशिस्त वागणूक केल्याने पाच वर्षांची शिक्षा व ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास १ वर्ष साधा कारावासाची शिक्षा सुनावली.

या खटल्यात सरकारी वकील शशिकांत पाटील यांनी युक्तिवाद केला. पैरवी अधिकारी म्हणून हिरालाल पाटील व उदयसिंग साळुंखे, हरीश तेली चोपडा यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Jalgaonpolicecrime