Gram Panchayat Election : मुक्ताईनगर, बोदवडमध्ये खडसेंचे वर्चस्व

eknath khadse
eknath khadseesakal
Updated on

जळगाव : जिल्ह्यातील मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी आपले वर्चस्व कायम राखले आहे. बोदवड तालुक्यात चार ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडे आल्या आहेत. एक ग्रामपंचायतीवर काँग्रेसची सत्ता आली आहे. भाजप- शिंदे गटाला एकही ग्रामपंचायत मिळाली नाही.

मुक्ताईनगरातील कुऱ्हा ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीने ताबा मिळविला आहे. उंचदा ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचे सर्व नऊ उमेदवार निवडून आले. मात्र सरपंच पदाचे उमेदवार शिंदे-भाजप गटाच्या पाठिंब्यावर निवडून आले आहेत. (Gram Panchayat Election Khadse Dominance in Muktainagar Bodwad Jalgaon News)

eknath khadse
Jalgaon News : भरबाजारातील कापड दुकान फोडले

जळगाव जिल्ह्यात माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा मुक्ताईनगर -बोदवड मतदार संघातील ग्रामपंचायतीकडे लक्ष होते. या ठिकाणी मुक्ताईनगर तालुक्यातील दोन तर बोदवड तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीच्या निवडणूका होत्या. खडसे यांच्या मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा ग्रामपंचायतीकडे लक्ष होते.

या ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरपंच पदाचे उमेदवार बी.सी. महाजन विजयी झाले. त्यांनी भाजप-शिंदे गटाचे भागवत राठोड यांचा पराभव केला. या ठिकाणी १३ सदस्य राष्ट्रवादीचे तर चार सदस्य भाजप -शिंदे गटाचे निवडून आले आहेत. तर मुक्ताईनगर तालुक्यातील उंचदा ग्रामपंचायतीत सर्व नऊ सदस्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निवडून आले आहेत. मात्र संरपंच पदाच्या उमेदवार भाजप-शिंदे गटाच्या वंदना दीपक गुल्हाणे निवडून आल्या आहे.

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

eknath khadse
Jalgaon News : ‘गायरान’ वरील अतिक्रमणे काढण्याची शासनाची भूमिका

बोदवड तालुक्यात वडजी ग्रामपंचायत सरपंचपदी राष्ट्रवादी बिनविरोध निवडून आले आहे. निमावल, धोंडखेडा, चिंचखेडासीम, या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. कोल्हाडी ग्रामपंचायत काँग्रेसच्या ताब्यात गेली असून महाविकास आघाडीने येथे बाजी मारली आहे. शिंदे-भाजप गटाला एकही जागा मिळालेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे व जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांनी आपले वर्चस्व तालुक्यावर कायम ठेवले आहे. शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांना धक्का मानला जात आहे.

eknath khadse
Jalgaon News : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींत वर्चस्वाचा भाजप- शिंदे गटाचा दावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Why did Sangli ACB register a bribery case?
Residents have questioned the transparency of the process and warned of approaching higher authorities over the alleged procedural violations.
Maharashtra Gram Panchayat Election 2026 latest update
Automatic weather station installation in Ratnagiri
Marathi News Esakal
www.esakal.com