Latest Marathi News | जिल्ह्यातील ग्रामपंचायतींत वर्चस्वाचा भाजप- शिंदे गटाचा दावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shinde Group BJP News

Jalgaon News : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींत वर्चस्वाचा भाजप- शिंदे गटाचा दावा

जळगाव : जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये झालेल्या १४० ग्रामपंचायतींमध्ये झालेल्या निवडणुकींमध्ये सर्वाधिक ठिकाणी भाजप व शिंदे गटाचे सरपंच निवडून आल्याचा दावा केला जात आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना ठाकरे गटानेही मविआचे गणित मांडत सर्वाधिक ग्रामपंचायती ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे.

जळगाव जिल्ह्यातील विविध १५ तालुक्यांमध्ये १४० ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक पार पडली. प्रत्येक गावात चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत विशेषतः तरुणांनी बाजी मारल्याचे चित्र दिसून येत आहे. काही ठिकाणी प्रस्थापितांना धक्का बसला. १४० ग्रामपंचायतींची आकडेवारी बघितली तर भाजप व शिवसेनेच्या शिंदे गटाने बहुतांश पंचायतीवर वर्चस्व राखल्याचा दावा केला जात आहे. (BJP Shinde faction claims supremacy in Gram Panchayats of district Jalgaon News)

हेही वाचा: Jalgaon News : राजस्थानच्या कार चोरट्याला अमळनेरमध्ये अटक

दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही ग्रामीण भागात आपली पकड कायम ठेवल्याचे सांगितले जात आहे. शिवसेनेच्या शिंदे व ठाकरे गट या दोघांपैकी शिंदे गटाचे वर्चस्व राहिल्याचे चित्र दिसते. जिल्ह्यात कॉंग्रेस नाही, अशी टीका करणाऱ्यांना कॉंग्रेसने काही ठिकाणी प्रभावी यश मिळवत चोख उत्तर दिल्याचेही दिसून येते.

असे आहेत दावे- प्रतिदावे

भाजपचा ७७ चा दावा

सुरेश ऊर्फ राजूमामा भोळे (जिल्हाध्यक्ष) : जिल्ह्यात मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात भाजपने १४० पैकी ७७ ग्रामपंचायतींवर वर्चस्व राखले. या ७७ ठिकाणी भाजपचे सरपंच निवडून आले असून बहुतांश सदस्यही भाजपचे झाले आहेत.

राष्ट्रवादीचा ६० वर दावा

ॲड. रवींद्र पाटील (जिल्हाध्यक्ष) : जिल्ह्यात माजी मंत्री एकनाथ खडसेंसह डॉ. सतीश पाटील, गुलाबराव देवकर आदींच्या नेतृत्वात तब्बल ६० ठिकाणी राष्ट्रवादी किंवा राष्ट्रवादी समर्थक सरपंच निवडून आले आहेत.

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

हेही वाचा: Jalgaon Crime News : बिस्मिल्ला चौकात बंद घर फोडले; सोन्याचे दागिन्यांसह रोकड लंपास

शिंदे गटाकडे ५५ पंचायती

गुलाबराव पाटील (पालकमंत्री) : शिवसेनेच्या शिंदे गटाने जळगाव ग्रामीण व धरणगाव तालुक्यासह जिल्ह्यातील अन्य ठिकाणी चांगले वर्चस्व राखले. जवळपास ५५ ग्रा.पं.त शिंदे गटाचे सरपंच निवडून आलेत.

ठाकरे गटाचे १८ सरपंच

विष्णू भंगाळे (जिल्हाप्रमुख) : शिवसेनेच्या ठाकरे गटाने बंडखोर शिंदे गटाला जोरदार प्रत्युत्तर दिल्याचे सांगत भंगाळे यांनी १८ ग्रा.पं.त ठाकरे गटाचे सरपंच झाल्याचा दावा केला आहे.

कॉंग्रेसकडे १६ ग्रामपंचायती

प्रदीप पवार (जिल्हाध्यक्ष) : कॉंग्रेस जिल्ह्यात नाही, अशी आमच्यावर टीका होत होती. मात्र, जिल्ह्यातील सुमारे १६ ग्रामपंचायतींवर कॉग्रेसचे व कॉग्रेस समर्थक सरपंच तर ९२ ग्रा.पं. सदस्य विजयी झाले आहेत.

हेही वाचा: Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा विकास निधी मंजूर