ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान यंत्रना सज्ज; प्रचारास उरले दोन दिवस 

evm
evm

जळगाव : जिल्ह्यात येत्या १५ जानेवारीस ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात एकूण २७७४ मतदान यंत्रे लागणार आहे. ती यंत्रे तहसील कार्यालयांना रवाना झाली आहेत. तहसील कार्यालयात ग्रामपंचायतनिहाय उमेदवारांच्या याद्या लावून यंत्रे सील करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण २४१२ मतदान केंद्र असतील. त्यावर १३ हजारांवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी २० हजार २६४ उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यात २८८ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले होते. तर १९ हजार ९७६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. माघारीच्या दिवशी ६ हजार १२९ उमेदवारांनी माघार घेतली होती. जिल्ह्यात ९३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. सध्या ७ हजार २१३ जागांसाठी १३ हजार २४७ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीस आता केवळ दोन दिवस शिल्लक उरल्याने उमेदवारांकडून प्रचारास आता वेग आला आहे. उमेदवार आपण आगामी काळात काय कार्य करणार आहेत याची माहिती मतदारांना देत आहे. प्रभाग लहान असल्याने काही उमेदवारांच्या तीनवेळा प्रचार फेऱ्याही झाल्या आहेत. 

मतदान कर्मचाऱ्यांना प्रात्यक्षीके लवकरच

सर्वच तहसील कार्यालयांनी मतदान यंत्रांत ग्रामपंचायतनिहाय उमेदवारांच्या याद्या लावण्याचे कार्य सुरू आहे. तहसील कार्यालयात गाव व मतदान केंद्रनिहाय मतदान यंत्रे तयार केली जात आहे. यात उमेदवारांच्या नावाची यादी निवडणूक चिन्हासह मतदान यंत्रावर लावण्याची कार्यवाही सुरू आहे. लवकरच मतदान कर्मचाऱ्यांना मतदानाचे प्रात्यक्षिके दाखविली जाणार आहेत. 

तालुका निहाय पाठविलेली मतदान यंत्रे अशी 
तालुका--एकूण मतदान केंद्र--आवश्यक सी.यू--आवश्यक बी.यू. 

जळगाव--१७०--१९६--१९६ 
जामनेर--२३३--२६८--२६८ 
धरणगाव-१२२--१४०--१४० 

भडगाव--९९--११४--११४ 
रावेर--१६५--१९०--१९० 
यावल--१७९--२०६--२०६ 
बोदवड--८०--९२--९२ 

अमळनेर--१५४--१७७--१७७ 
पाचोरा--२९५--३३९--३३९ 
भुसावळ--११८--१३६--१३६ 
एरंडोल--११८--१३६--१३६ 

पारोळा--१३०--१५०--१५० 
चाळीसगाव--२३७--२७३--२७३ 
मुक्ताईनगर--१५१--१७४--१७४ 
चोपडा--१६१--१८५--१८५ 
एकूण--२४१२---२७७४--२७७४ 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com