शिवसेनेचे मुलकमैदान तोफ समजल्या जाणाऱ्या नेत्याच्या गावातच 'शिवसेना विरुध्द शिवसेना' अशी काट्याची लढत 

शिवसेनेचे मुलकमैदान तोफ समजल्या जाणाऱ्या नेत्याच्या गावातच 'शिवसेना विरुध्द शिवसेना' अशी काट्याची लढत 

जळगाव : शिवसेनेचे व खानदेशचे मुलूक मैदानतोफ समजले जाणारे तथा राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी खुर्द गावात ग्रामपंचायतीची निवडणूकीची सर्वत्र चर्चा आहे. कारण काही ग्रामपंचातीत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी त्यांना यश आले. परंतू त्यांच्या गावात निवडणूक बिनविरोध ते करू शकले नाही. त्यात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी निवडणूक लागली असून ही निवडणुकीची सर्वत्र एकच चर्चा होत आहे. 

मंत्री गुलाबराव पाटील यांचे पाळधी बुद्रुक हे गाव गावाचा दुसरा भाग पाळधी खुर्दच्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक बिनविरोध होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.होते, पण ते निष्फळ ठरल्याने याठिकाणी शिवसेनेच्या स्वकियांमध्येच लढत रंगली आहे.

गुलाबरावांचे वर्चस्व पण..

या दोन्ही गावांमध्ये गुलाबराव पाटील यांच्या शिवसेनेचे वर्चस्व आहे. असे असतांना गुलाबराव पाटील यांना पाळधी खुर्दची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करू शकले नसून शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात निवडणुक लढवित आहे. त्यामुळे निवडणूकीला चांगलीच रंगत आली आहे. कोण यात बाजी मारेल याची उत्सुकता गावाला लागली आहे.

शिवसेनेचे एकमेकांना आव्हान...
पाळधी खुर्द ग्रामपंचायतीत गेल्या 25 वर्षांपासून शिवसेना नेते गुलाबराव पाटील वर्चस्व आहे. शरद कासट हे गुलाबरावांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख आहे. तर दुसरे कार्यकर्ते दिलीप पाटील असे  यांनी आव्हान उभे केले आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com