
जामनेर तालुक्यात ७३ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच कारभारी कामाला लागले. गावागावांत सरपंच पदावर डोळा ठेवून अनेकांनी मोर्चेबांधणी सुरू केली होती
तळेगाव (ता. जामनेर) : तळेगावसह जामनेर तालुक्यात ७३, तर जिल्ह्यातील ७८३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका १५ जानेवारीला होणार आहेत. त्यामुळे गावागावांतला नूर पालटला आहे.
आवश्य वाचा- सूडाचे राजकारण.. अन् विकासाची शोकांतिका
यापूर्वी प्रत्येक वेळी निवडणुकीसाठी पॅनलप्रमुखांकडून सर्व यंत्रणा राबविली जात असे. उमेदवारांच्या उमेदवारी खर्चापासून ते प्रचार यंत्रणेपर्यंतचा खर्च उचलला जायचा. मात्र, यंदा सरपंचपद कोणाकडे जाणार, हे निवडणुकीनंतर कळणार असल्याने खर्च कुणी आणि कोणासाठी करायचा, हा मुद्दा उपस्थित झाला आहे.
अनेकांचा सरपंच पदावर डोळा
तळेगावसह जामनेर तालुक्यात ७३ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच कारभारी कामाला लागले. गावागावांत सरपंच पदावर डोळा ठेवून अनेकांनी मोर्चेबांधणी सुरू केली होती.
आवर्जून वाचा- चारशे वर्षानंतर योग..गुरु- शनिमधील 'महायुती'चा आज नजारा
पॅनलचा खर्च कुणी करावा
मात्र, या आनंदावर राज्य सरकारच्या परिपत्रकाने पाणी फिरवले. कारण सरपंचपदाचे आरक्षण ग्रामपंचायत निवडणूक झाल्यानंतर जाहीर होणार आहे. त्यामुळे गावातील पॅनलचा खर्च कुणी करायचा, असा प्रश्न गावपुढाऱ्यांसमोर आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे