Jalgaon News | ग्रामसेवक, सरपंचांनी पारदर्शकपणे काम करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Guardian Minister Gulabrao Patil while inaugurating the Adarsh ​​Gram Sevak Award distribution ceremony by Zilla Parishad on Saturday

Jalgaon News | ग्रामसेवक, सरपंचांनी पारदर्शकपणे काम करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव : ग्रामसेवक केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोचवून गरजूंना लाभ देण्याचे काम करीत असल्याने ग्रामीण विकासामध्ये ग्रामसेवकाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे.

ग्रामसेवक व सरपंचांनी कर्तव्य भावनेतून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शकपणे काम करावे, असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शनिवारी (ता. ४) येथे केले. (gram Sevak Sarpanch should work transparently Guardian Minister Gulabrao Patil Jalgaon News)

येथील नियोजन सभागृहात ग्रामविकास विभाग, जिल्हा परिषदेतर्फे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळा व सुजल, समृद्ध जळगाव अभियानाच्या (डासमुक्त जळगाव) प्रारंभाप्रसंगी ते बोलत होते.

ग्रामविकास व पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याणमंत्री गिरीश महाजन अध्यक्षस्थानी होते. खासदार उन्मेष पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अमन मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी डॉ. पंकज आशिया, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन, मुख्य लेखा व वित्त अधिकारी बाबूलाल पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील आदी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, की पुरस्कार मिळाल्याने पुरस्कारार्थ्यांची जबाबदारी अधिक वाढली आहे. आपण करीत असलेल्या कामाचे आपल्याला समाधान वाटले पाहिजे, असे काम सर्वांच्या हातून घडावे. जळगाव जिल्हा डासमुक्त करण्याचा संकल्प करावा.

ग्रामविकासमंत्री महाजन म्हणाले, की ग्रामसेवक व तलाठी ग्रामीण भागाच्या विकासाची दोन चाके आहेत. ग्रामीण भागाच्या विकासात ग्रामसेवकाचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. शासनाच्या योजनांचा लाभ गरजू लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी स्वतःहून पुढाकार घ्यावा.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

मान्यवरांच्या हस्ते जळगाव जिल्ह्यातील २०१४-१५ ते २०१६-१७ या कालावधीचे आदर्श ग्रामसेवक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. २०१४-१५ मधील पुरस्कारार्थींची नावे व कंसात गाव : शीतल पाटील (अमळनेर), विकास पाटील (भडगाव), गणेश सुरवाडकर (भुसावळ),

दिनेश वळवी (बोदवड), दीपक जोशी, (चोपडा), हरिभाऊ पाटे, (चाळीसगाव), प्रल्हाद पाटील (एरंडोल), प्रतिभा पाटील (जामनेर), रवींद्र चौधरी (पाचोरा), ज्ञानेश्वर साळुंखे (पाचोरा), रवींद्र नागरुद, (मुक्ताईनगर), देवीदास पाटील (रावेर), सुनील फिरके (यावल).

२०१५-१६ चे आदर्श ग्रामसेवक पुरस्कारार्थींची नावे व कंसात गाव : कविता साळुंखे (अमळनेर), भिला बोरसे (भडगाव), गोविंद राठोड (भुसावळ), पंढरीनाथ झोपे (बोदवड), नंदकिशोर सोनवणे (चोपडा), दिलीप अहिरे (चाळीसगाव),

नारायण माळी (एरंडोल), संदीप महाजन (धरणगाव), रूपाली साळुंखे (जळगाव), भास्कर महाजन (जामनेर), अविनाश पाटील (पाचोरा), नरेंद्र साळुंखे (पारोळा), मनोहर चौधरी (मुक्ताईनगर), कुंदन कुमावत (रावेर), संजीव चौधरी (यावल).

२०१६-१७ चे पुरस्कारार्थींची नावे व कंसात गाव : राजेश पाटील (अमळनेर), शरद पाटील (भडगाव), पंकज चौधरी (भुसावळ), चिंतामण राठोड (बोदवड), मधुकर चौधरी (चोपडा), सविता पांडे (चाळीसगाव), रमेश पवार (एरंडोल), अनिल पाटील (धरणगाव), उल्हासराव जाधव (जळगाव), गोविंदा काळे (जामनेर), स्वाती पाटील (पाचोरा), प्रीती जढाल (मुक्ताईनगर), रुबाब मोहंमद तडवी (यावल).