NMC News : डिझेल पुरवठादार नियुक्तीचा पाचवा प्रयोग अपयशी

NMC Latest News
NMC Latest Newsesakal

नाशिक : पेट्रोल- डिझेलच्या पुरवठ्यासाठी नाशिक महापालिकेच्या टेंडरला प्रतिसाद मिळत नाही. यापूर्वी चार देकार प्रसिद्ध करूनही त्याला प्रतिसाद मिळाला नाही.

नाशिक महापालिकेने स्वतः पेट्रोलपंप सुरू करून त्या माध्यमातून स्वमालकीच्या वाहनांना पेट्रोल-डिझेल भरण्याचा प्रयोग महागात पडला असून, त्यामुळे महापालिकेला दरवर्षी ३२ लाख रुपये तोटा होत आहे. (NMC News Fifth attempt of diesel supplier appointment failed nashik news)

महापालिकेकडे सध्या लहान- मोठी २१३ वाहने आहेत. यात अधिकारी, पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या वाहनांसह रुग्णवाहिका, ट्रक, शववाहिका आदी वाहने आहेत. या वाहनांना पेट्रोल, डिझेल पुरवठ्यासाठी महापालिकेने पंचवटी येथील भांडार विभागाच्या जागेत भारत पेट्रोलियम कंपनीकडून पेट्रोल- डिझेल पंप चालवण्यास घेतला.

महापालिकेकडून वाहनांसाठी दरमहा २० हजार लिटर डिझेलची खरेदी या पंपाच्या माध्यमातून भारत पेट्रोलियम कंपनीकडून केली जात होती. मात्र, भारत पेट्रोलियम कंपनी महापालिकेला प्रतिलिटर १३ रुपये अधिक दराने डिझेलचा पुरवठा करीत असल्यामुळे वाहनांसाठी स्वतःचा पेट्रोलपंप उभारणे महापालिकेला चांगलेच महागात पडले आहे.

महापालिकेला या पंपामुळे दरवर्षी खासगी पंपधारकाच्या तुलनेत दरवर्षी सुमारे ३२ लाखांचा भुर्दंड सहन करावा लागत होता. यामुळे लेखा परीक्षण विभागाने या खरेदीवर आक्षेप नोंदवला आहे. स्वतःचा पंप चालवण्याऐवजी खासगी पंपावरून इंधन खरेदीची सूचना केली आहे.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

NMC Latest News
Dhule News : चारही शिक्षिका लेकींनी दिला आईला खांदा अन् मुखाग्नी

नाशिक महापालिकेला थेट पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधन खरेदी करावी लागत असल्याने दरवर्षी ३२ लाखांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे महापालिकेने आपल्या स्वमालकीच्या पेट्रोलपंपाला टाळे लावत खासगी पेट्रोलपंपावरून इंधन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

मात्र, यासाठी काढलेल्या टेंडरला प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. महापालिकेने पेट्रोल-डिझेल पुरवण्यासाठी खासगी पुरवठादारांकडून दर मागवण्यासाठी यापूर्वी टेंडर प्रसिद्ध केले असून, त्याला टेंडरमध्ये तीन पुरवठादार सहभागी न झाल्याने निविदा प्रक्रियेला पाच वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यालादेखील प्रतिसाद मिळालेला नाही.

NMC Latest News
Nashik News : RBI कडून फैज बॅंकेवर निर्बंध; रक्कम काढून घेण्यासाठी बँकेत मोठी गर्दी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com