
यंदा गणरायालाही GSTची झळ... मूर्तींच्या दरात होणार वाढ...
वावडे (ता. अमळनेर) : गणेशमूर्तीच्या कच्च्या मालावर असलेल्या ‘जीएसटी’मुळे दरांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे पीओपीच्या दरात सुमारे ४० ते ५० टक्के वाढ झाल्याने गणेशमूर्तींच्या दरात सुमारे २० टक्के वाढ होण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तविली जात आहे. (Latest Marathi News)
दोन वर्षांपूर्वी जगभरामध्ये कोरोना या संसर्गजन्य आजाराने शिरकाव केला. यातून सर्वांचे जनजीवन ठप्प झाले. भारतात देखील निर्बंध लावण्यात आले. यामुळे सर्व सण, उत्सव नियमांचे पालन करून साजरे करावे लागले. पण यंदा निर्बंधमुक्त झाल्याने सर्वधर्मीय सण, उत्सव हे मोठ्या उत्साहाने साजरे होत आहेत. यंदा ३१ ऑगस्टला सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणार आहे. मात्र, वाढत्या महागाईमध्ये रंग, माती आणि कारागिरांचा खर्च वाढल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी गणेशमूर्तींच्या किमती २० टक्क्यांनी महागलेल्या असतील, असे सुरेश कुंभार मूर्तिकार सांगतात.
हेही वाचा: जळगाव : संगणक परिचालकांचे मानधन रखडले; कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ
कोरोनाच्या दोन वर्षानंतर गणेशोत्सव निर्बंधमुक्त साजरा करण्यात येणार आहे. यासाठी मूर्तिकारांची ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. देशातील व राज्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले. यंदाचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त साजरा करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे. यामुळे गणेशभक्तांसह जनतेमध्ये उत्साहाचे वातावरण बघायला मिळत आहे.
हेही वाचा: De Dhakka च्या टीमशी खास गप्पा
Web Title: Gst Applicable On Ganpati Idols
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..