Gulabrao Patil : निराधार योजनेच्या लाभासाठी प्रस्ताव सादर करावेत : पालकमंत्री पाटील

gulabrao patil
gulabrao patilesakal

Jalgaon News : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या वारसांना शासकीय नियमाप्रमाणे आर्थिक मदत दिल्यानंतर प्रशासकीय जबाबदारी संपुष्टात येत असली, तरी सामाजिक जबाबदारी कायम राहते. (Guardian Minister Gulabrao Patil instructions for Niradhar Yojana Proposals jalgaon news)

कुटुंबातील कर्ता व्यक्ती गेल्यानंतर संपूर्ण कुटुंब असह्य होते. विशेषतः शेतकरी बांधवांच्या कुटुंबीयांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. अशा कुटुंबांच्या पाठीशी शासन व प्रशासन खंबीरपणे उभे आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पात्र वारसांना संजय गांधी निराधार योजनेतून लाभ मिळावा, यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात जळगाव तालुक्यातील दोन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रुपये मदतीचा धनादेश, तर गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत धरणगाव तालुक्यातील बांभोरी बुद्रुक, पिंप्री व बांभोरी प्र. चा. येथील तीन शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी २ लाखांप्रमाणे ६ लाखांचे धनादेशवाटप करण्यात आले. तालुका कृषी अधिकारी पी. जे. चव्हाण व कृषी सहाय्यक उपस्थित होते.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

gulabrao patil
Bazar Samiti Result : चाळीसगाव बाजार समितीत भाजपची सरशी

५० लाखांचे सानुग्रह अनुदानवाटप

तहसील कार्यालयाच्या आस्थापनेवर कोतवाल म्हणून कार्यरत असलेले नाना लक्ष्मण वाघ (रा. शिरसोली) यांचा कर्तव्य पार पाडताना कोरोनाने २८ मार्च २०२१ ला मृत्यू झाला होता. पालकमंत्री पाटील यांच्या पाठपुराव्याने त्यांना शासनाकडून ५० लाखांचे सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले होते. नाना वाघ यांच्या कायदेशीर वारसास ५० लाखांचे सानुग्रह अनुदान पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. जिल्हाधिकारी अमन मित्तल, तहसीलदार नामदेव पाटील, महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.

gulabrao patil
Jalgaon News : ...अन् शाळेतील फळेही बोलू लागले..!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com