वसतिगृहाच्या 42 कोटींच्या निधीसाठी पाठपुरावा करू : पालकमंत्री पाटील

Gulabrao Patil Inaugurates project
Gulabrao Patil Inaugurates projectesakal

जळगाव : ज्या ठिकाणी ज्ञानदानाचे कार्य होते तिथे सौर ऊर्जा प्रकल्पाचा (Solar energy project) शुभारंभ करताना आत्मीक समाधान मिळत आहे. विद्यापीठातील (University) विविध कामांसाठी निधीला कोणत्याही प्रकारे कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केली. विद्यापीठातील मुलांच्या आणि मुलींच्या प्रत्येकी २०० इतकी क्षमता असणाऱ्या दोन वसतिगृहासाठी (hostel) ४२ कोटी रूपयांच्या निधीसाठी आपला पाठपुरावा सुरू असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. (Guardian Minister Gulabrao Patil Statement about North maharashtra university hostel Jalgaon News)

पालकमंत्र्यांच्या हस्ते कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील ६५० मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या कामास रविवारी प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. या ऊर्जा प्रकल्पासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून ३ कोटी ७५ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून यामुळे विद्यापीठाच्या वीज बिलात मोठी बचत होणार आहे. हा प्रकल्प कॅपेक्स मोडवरील असून तो पारेषणाशी संलग्न असणारा आहे. या प्रकल्पाच्या उभारणीचा शुभारंभ आज सकाळी विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झाला. कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्‍वरी, उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे, प्र-कुलगुरू डॉ. इंगळे, प्रभारी कुलसचिव डॉ. किशोर पवार आदी उपस्थित होते.

Gulabrao Patil Inaugurates project
Jalgaon : प्राणघातक हल्ल्यातील दोघांना अटक

कुलगुरू डॉ. माहेश्‍वरी यांनी सौर ऊर्जा प्रकल्पामुळे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाचे वीज बिल दोन तृतीयांशने कमी होणार असल्याचे सांगत अतिशय संवेदनशील लोकप्रतिनिधी म्हणजेच मंत्री गुलाबराव पाटील होत अशा शब्दांमध्ये त्यांनी पालकमंत्र्यांचे कौतुक केले.

Gulabrao Patil Inaugurates project
Jalgoan : RTO तर्फे 6 सेवा ‘फेसलेस पद्धतीने’ सुरू

प्रभारी कुलगुरू प्राध्यापक किशोर पवार यांनी प्रास्ताविकात विद्यापीठाच्या वाटचालीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण व्यवस्थापक अनंत अग्निहोत्री यांचे स्वागत करण्यात आले. डॉ. सुनील पाटील यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com