Jalgaon District Bank News | जिल्हा बँक अध्यक्षपदाचा आज राजीनामा देणार : गुलाबराव देवकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon District Bank News

Jalgaon News: जिल्हा बँक अध्यक्षपदाचा आज राजीनामा देणार : गुलाबराव देवकर

Jalgaon News: जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या राजीनाम्याबाबत आपली कार्यकर्त्यांशी चर्चा झाली आहे. मंगळवारी (ता. ७) आपण पदाचा राजीनामा देणार आहोत, अशी माहिती जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांनी दिली.

जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. यामुळे नवीन अध्यक्ष नियुक्तीबाबत जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने निर्णय घेण्यात आला होता. (Gulabrao Deokar District Bank Chairmanship resign today Decision after discussion with workers Jalgaon News)

हेही वाचा: प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी हा निर्णय पत्रकार परिषदेत जाहीर केला होता. याबाबत त्यांनी सांगितले होते, की जिल्हा बँकेची निवडणूक झाल्यानंतर महाविकास आघाडीचे बहुमत झाले होते.

त्यावेळी बँकेचे अध्यक्ष व उपाध्यक्षपद एक-एक वर्षे नियुक्त करण्याचे ठरले होते. त्यानुसार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संचालक म्हणून आम्ही अध्यक्षपदाचा राजीनामा घेण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे. उपाध्यक्षपद शिवसेना (शिंदे गट) यांच्याकडे असल्याने त्यांचा राजीनामा घेण्याचा निर्णय ते घेणार आहेत. मात्र, बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा गुलाबराव देवकर मंगळवारी देतील.

दरम्यान, देवकर यांनी सांगितले, की आपल्याला निवडणुकीत मजूर सोसायटी व इतर कार्यकर्त्यांनी सहकार्य केले आहे. याबाबत आपण दिवसभर त्यांच्याशी चर्चा केली. त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आपण मंगळवारी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.