Gulabrao Patil News : होय, तुमच्या हक्काचा सात-बारा उतारा मिळणारच; अतिक्रमणग्रस्तांना पालकमंत्र्यांचा दिलासा

Gulabrao Patil
Gulabrao Patilesakal

Gulabrao Patil News : बेघर असलेल्यांनी घरांची मागणी करणे, हा त्यांचा हक्क आहे. ‘कुणी काहीही म्हटले तरी धरणगावातील अतिक्रमणग्रस्तांची जागा ही शासन निर्णयानुसार तुमच्या नावावर लागणार आहे. तुमच्या हातात सात-बारा मिळणारच.

टप्या-टप्याने २०११ पूर्वीची अतिक्रमित घरे नियमित करणार असून, पहिल्या टप्यात ५०० अतिक्रमित घरे नियमित करणार आहे, अशा शब्दांत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अतिक्रमणग्रस्तांना दिलासा देत आश्‍वस्त केले. (gulabrao patil statement about encroachment victims jalgaon news)

अतिक्रमणधारकांनी संयम व सबुरीने प्रशासनाला सहकार्य करण्याचेही आवाहन गुलाबराव पाटील यांनी केले. ते धरणगाव शहर बेघर संघर्ष समितीतर्फे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
या वेळी बेघर अतिक्रमण समितीचे प्रमुख ॲड. वसंतराव भोलाणे यांनी सांगितले, की धरणगावातील अतिक्रमणग्रस्तांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यामुळेच हक्काची जागा मिळणार आहे.

विशेष म्हणजे मोजणी फी सुद्धा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार प्रशासनाने भरली आहे. तर सामाजिक कार्यकर्ते रवी कंखरे व म्हणाले, की अतिक्रमितधारकांनी कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नका. भाजपचे संजय महाजन यांनीही अतिक्रमणधारकांना आश्वस्त केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Gulabrao Patil
Gulabrao Patil News : उर्वरित केळी विमा क्षेत्राची तत्काळ पडताळणी करा : पालकमंत्री पाटील

धरणगाव शहर बेघर अतिक्रमण संघर्ष समितीच्या सभासदांनी नगरपालिकेत निवेदन देण्यासाठी मोर्चा काढला होता. त्या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. या प्रसंगी शहर बेघर संघर्ष समितीतर्फे गुलाबराव पाटील यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी बेघर अतिक्रमण समितीचे ॲड. वसंतराव भोलाणे व प्रा. रवींद्र कंखरे, ओबीसी सेलचे जिल्हाप्रमुख संजय महाजन, उपजिल्हाप्रमुख पी. एम. पाटील, भाजपचे माजी गटनेते कैलास माळी, शिरीष बयस, एरंडोल प्रांताधिकारी मनीष गायकवाड, धरणगाव तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, धरणगाव मुख्याधिकारी विकास नवले, गट नेते पप्पू भावे, शहर मुख विलास महाजन, दिलीप महाजन, दीपक साळुंखे , संजय चौधरी, बुटया पाटील, कन्हय्या महाजन, आण्णा महाजन, भय्या महाजन, बबलू मराठे, पापा वाघरे, बालू जाधव तसेच धरणगाव शहरातील अतिक्रमण धारक महिला व पुरुष यांच्यासह पदाधिकारी व लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Gulabrao Patil
Gulabrao Patil News : संभाव्य टंचाईग्रस्त गावांत मिशन मोडवर कामे करा; मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com