Latest MarathI News | हर घर तिरंगा : जळगावात महिला बचत गटाच्या माध्यमातून मिळणार तिरंगा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Har Ghar Ghar Tiranga

हर घर तिरंगा : जळगावात महिला बचत गटाच्या माध्यमातून मिळणार तिरंगा

जळगाव : दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांर्तगत ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम संपूर्ण देशभर साजरा केला जाणार आहे. प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज तिरंगा लावण्यात येणार आहे. नागरिकांना ध्वज महिला बचत गटामार्फत माफक किमतीत उपलब्ध व्हावा, यासाठी त्या स्टॉलचा बुधवारी (ता. ३) महापौर जयश्री महाजन व आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. (Latest Marathi News)

हेही वाचा: Video: 'हर घर तिरंगा' गाण्याला विरोध

घरावर राष्ट्रध्वज लावण्यात येणार आहेत. जळगाव शहर स्तरीय संघाने राष्ट्रध्वज तयार केले आहेत. हा ध्वज प्रत्येक भारतीय नागरिकांच्या घरावर लावण्याचा शासनाचा निर्णय आहे. राष्ट्रध्वज विक्री (तिरंगा) स्टॉलचे महापौर जयश्रीताई महाजन व आयुक्त श्रीमती डॉ. विद्या गायकवाड व अतिरिक्त आयुक्त श्‍याम गोसावी यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. शहरातील १४ ठिकाणी बचत गटामार्फत तयार करण्यात आलेल्या राष्ट्रध्वजाची विक्री माफक दारात करण्यात येत आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी राष्ट्रध्वजाची खरेदी करावी, असे आवाहन या वेळी करण्यात आले.

हेही वाचा: मोदींमुळेच देश जागृत होतोय; राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची स्तुतीसुमनं

जळगाव शहरस्तरीय संघाच्या अध्यक्ष विजया देवरे, सचिव अनिता जगताप, रजनी सोनवणे, आशा सपकाळे, कविता कुमावत, अल्का पवार, महापालिकेच्या श्रीमती गायत्री पाटील, शहर अभियान व्यवस्थापक शालिग्राम लहासे, आशा चौधरी, अमोल भालेराव, राहुल बडगुजर, राजेश गडकर, कविता जाधव, शीतल कंखरे आदी या वेळी उपस्थित होते.

Web Title: Har Ghar Tiranga Available In Jalgaon Through Women Self Help Groups

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Jalgaon