कार घेण्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Domestic violance latest jalgaon crime news
Domestic violance latest jalgaon crime newsesakal

बातमीदार : जीवन चव्हाण

चाळीसगाव (जि. जळगाव) : कार घेण्यासाठी आई-वडिलांकडून पाच लाख रुपये घेऊन ये, म्हणत एका विविहीतेला शाररिक व मानसिक छळ (Physical and mental torture) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

याप्रकरणी पतीसह सासरच्यांविरुद्ध चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Harassment of spouse to buy car Case filed against 5 people including husband jalgaon latest crime news)

याबाबत सविस्तर वृत्त, चाळीसगाव शहरातील हिरापूर रोड परिसरातील माहेर असलेल्या हेमांगी निखिल ठाकूर (वय-२८) हिचा ३१ जानेवारी २०२० रोजी निखिल दगा ठाकूर (रा. बदलापूर जिल्हा. ठाणे ) नामक व्यक्तीशी विवाह झाला.

पती निखिल हा अमरनाथ शिवाजी नगर, पोलीस स्थानकात नेमणुकीस आहे. दरम्यान हेमांगीला सुरुवातीला तीन चार महिने पतीसह सासरच्या मंडळींकडून चांगली वागणूक मिळाली. त्यानंतर कार घेण्यासाठी तुझ्या आई-वडिलांकडून पाच लाख रुपये घेऊन ये सांगून पतीसह सासरच्यांनी शाररिक व मानसिक छळ करायला सुरुवात केली.

आईवडिलांची परिस्थिती हलाखीची असल्याने तिने देण्यास नकार दिला. याचाच राग येऊन सासूने सहा महिन्याच्या गरोदर हेमांगीच्या अंगावरील ५ ग्रॅम सोन्याची पोत, ५ ग्रॅम सोन्याची काप व चांदीच्या साखळ्या काढून घेतली. व तिला घराबाहेर हाकलून दिले.

Domestic violance latest jalgaon crime news
फुले मार्केटमधील कापड दुकान फोडले; चोरट्यांनी लांबवले 45 हजारांचे कपडे

जोपर्यंत पैसे घेऊन येत नाही. तोपर्यंत घरात पाय ठेवायचे नाही. अशी तंबी दिली. ठेव्हापासून हेमांगी हि चाळीसगाव येथे आपल्या आईवडिलांसोबत वास्तव्याला आहे. तत्पूवी ८ डिसेंबर २०२० रोजी हेमांगीला पुत्ररत्न प्राप्त झाला.

बाळंतपण झाल्यानंतर तब्बल बारा दिवसांनी पती निखिल मुलाला बघण्यासाठी आला असता उलटसुलट बोलून नांदविण्यास तयार नसल्याचे त्यांनी सांगितले.

त्यावर चाळीसगाव शहर पोलीस स्थानक गाठून हेमांगीने पती निखिल दगा ठाकूर, सासू गं. भा. रत्नाबाई दगा ठाकूर, दीर चंद्रकांत दगा ठाकूर, नणंद जयश्री दीपक ठाकूर, नांदोई दीपक नामदेव ठाकूर दोन्ही रा. दोंडाईचा जिल्हा धुळे व माम सासरे संतोष नथ्थू चव्हाण रा. जव्हार राज्य गुजरात यांच्याविरुद्ध १६ जुलै रोजी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरु आहे.

Domestic violance latest jalgaon crime news
Jalgaon : किराणा दुकान फोडून ‘गेंदा’ टोळीने गाठली मुंबई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com