Latest Marathi News | जळगाव : रिक्षा घेण्यासाठी पत्नीचा छळ; पतीसह सासरच्यांवर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Domestic violance latest jalgaon crime news

जळगाव : रिक्षा घेण्यासाठी पत्नीचा छळ; पतीसह सासरच्यांवर गुन्हा

जळगाव : शहरातील रामेश्वर कॉलनीतील विवाहितेने माहेरून रिक्षा घेण्यासाठी ५० हजार रुपये आणावेत म्हणून पतीकडून तिचा छळ सुरू आहे. छळाला कंटाळलेल्या विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून पतीसह सासरच्या चार जणांविरोधात एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला. (Latest Marathi News)

हेही वाचा: ‘पाणी उकळून प्या’ म्हणा अन्‌ जबाबदारी झटका : धुळे महापालिकेची नीती़

जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीत मंगलाबाई राजू माळी यांचा इंदूर येथील राजू माळी यांच्याशी विवाह झाला आहे. लग्नानंतर काही दिवस चांगले गेल्यावर पती राजू माळी याच्यासह इतरांनी विवाहिता मंगलाबाई हिला तिने माहेरून रिक्षा घेण्यासाठी ५० हजार रुपये आणावेत म्हणून त्रास देण्यास सुरवात केली. माहेरची परिस्थिती जेमतेम असल्याने पैसे मिळत नाहीत म्हणून पतीचा छळ असह्य झाल्याने मंगलाबाई माळी माहेरी पोचल्या. या प्रकरणी मंगलाबाई हिच्या तक्रारीवरून पती राजू शांताराम माळी, बबलाबाई शांतराम माळी (दोघे रा. इंदूर), अनिता रामेश्वर भोंगड, रामेश्वर भोंगड (दोघे रा. धुळे) या चौघांविरोधात शनिवारी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

हेही वाचा: हुंडा न दिल्याने सासरच्यांकडूनच सामूहिक बलात्कार, नवऱ्यानेच शूट केला व्हिडीओ

Web Title: Harassment Of Wife By Husband In Jalgaon Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..