‘पाणी उकळून प्या’ म्हणा अन्‌ जबाबदारी झटका : धुळे महापालिकेची नीती़

शहरातील अनेक भागांमध्ये दूषित पाणीपुरवठ्याची समस्याने हे आजार बळावत असल्याचे चित्र आहे.
Water
Wateresakal

धुळे : महापालिकेच्या दवाखान्यासह शहरातील खासगी दवाखान्यांमध्ये सध्या डायरीया, पोटदुखीसारख्या समस्या असलेले रुग्ण पाहायला मिळतात. शहरातील अनेक भागांमध्ये दूषित पाणीपुरवठ्याची समस्याने हे आजार बळावत असल्याचे चित्र आहे. पावसाळा असल्याने गढूळ पाणीपुरवठा होत आहे, पाणी उकळून आणि गाळून प्या असे आवाहन करुन महापालिकेकडून जबाबदारी झटकण्याचा प्रकार सुरु आहे. (Latest Marathi News)

पावसाळा सुरु झाल्यानंतर नदी, नाले, तलावात गाळ वाहून येणे ही नैसर्गिक प्रक्रीया आहे. याच जलस्त्रोतांमधून नागरिकांना पाणीपुरवठा होतो, त्यामुळे जलशुद्धीकरणाच्या प्रक्रियेत अडचणी येतात. असे असले तरी धुळे शहरात गढूळ पाण्यासह काळपट, दुर्गंधीयुक्त, दूषित पाणीपुरवठाही होतो हे नाकारुन चालणार नाही. पाणीपुरवठा झाल्यानंतर भांड्यामधील पाणी पाहून हे पाणी कसे प्यायचे असा प्रश्‍न नागरिकांपुढे उभा राहतो ही वस्तुस्थिती आहे.

Water
पोलिसांचा अजब कारभार : आजार बेंबीला अन्‌ मलम शेंडीला

गळ्यत्यांमुळे पाणी दूषित
धुळे शहरात मुख्य जलवाहिन्यांसह अंतर्गत जलवाहिन्यांना गळत्यांचे प्रमाण मोठे आहे. काही ठिकाणी तर गळत्याच सापडत नाहीत अशी स्थिती आहे. अनेक नगरसेवक आपापल्या प्रभागातील गळत्यांचा प्रश्‍न स्थायी समिती सभेत मांडतात, त्यावर अपेक्षित कार्यवाही मात्र होत नाही. स्थायी समिती सभापती शीतल नवले यांनी नियमित पाणीपुरवठ्यासाठी पुढाकार घेऊन काम सुरु केले. त्यात त्यांना काही प्रमाणात यश मिळाले, त्याबद्दल त्यांचे कौतुकही झाले. मात्र गळत्यांच्या समस्येवर पाहिजे तेवढे काम झाले नाही. परिणामी सध्या शहरात अनेक भागात दूषित पाणीपुरवठ्याची समस्या कायम आहे.

अधिकाऱ्यांची ‘होजी’ नीती
नगरसेवक, पदाधिकारी पोटतिडकीने समस्या मांडतात. त्यादृष्टीने अधिकारी, अभियंत्यांना उपाययोजनेच्या सूचना देतात. अधिकारी आणि अभियंते होजी सर, होजी सर म्हणत वेळ मारुन नेतात. प्रत्यक्षात काम मात्र होत नाही. अशा कार्यपद्धतीमुळेच लाखो रुपये खर्च करुनही दूषित पाणीपुरवठ्याची समस्या दूर होत नाही.

Water
शिंदे -फडणवीस रात्रीचं जेवण दिल्लीत, दुपारचं मुंबईत करतात - नाना पटोले

आवाहन करा, हात झटका
पावसाळ्यात पाणी गाळून, उकळून प्या असे आवाहन करणे चुकीचे नाही पण केवळ आवाहन करुन दूषित पाण्याची समस्या सुटणारी नाही. घराघरांमध्ये जाणारे पाणी अत्यंत खराब असेल तर ते भांड्यांमध्ये भरुन ठेवावे की नको हाच मुळात पहिला प्रश्‍न उभा राहतो. त्यामुळे केवळ आवाहन करुन हात झटकणे योग्य नाही.

अनेक घरांना पाणीच मिळेना
आठ-आठ दिवसानंतरही त्या-त्या भागातील काही घरांना पाणी मिळेल की नाही याची शाश्‍वती नसते. कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे अनेक ठिकाणी पाणीपुरवठा झाल्याचेच कळत नाही. तीन-चार तासांनी पाणी पोचेलच तर ते कधी बंद होईल सांगता येत नाही. बऱ्याचदा पाणीपुरवठा झालेला असतो मात्र विद्युतपुरवठा बंद होतो. त्यामुळे संबंधितांना पुन्हा पुढच्या आठ दिवसाची वाट पाहावी लागते. महापालिकेने नव्याचे नऊ दिवस पाणीपुरवठा वितरणाचे वेळापत्रक जाहीर केले, नंतर काय झाले माहीत नाही.

Water
म्यानमारमध्ये ४ लोकशाही समर्थकांना फाशी; ५० वर्षांत प्रथमच

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com