Jalgaon News : हातलेच्या कन्येची प्रशासकीय सेवेत झेप

Sucess Story
Sucess Storyesakal

चाळीसगाव : घरची परिस्थिती साधारणतः असताना व कुटुंबात शिक्षणाचा कुठलाही वारसा नसताना हातले (ता. चाळीसगाव) येथील शेतकरी कन्येने जिद्द आणि अभ्यासात ठेवलेल्या सातत्यावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करीत प्रशासकीय सेवेत घेतलेली झेप ग्रामीण भागातील मुलामुलींसाठी प्रेरणादायी ठरली आहे. प्रियंका पाटील असे या यशस्वी शेतकरीकन्येचे नाव असून तिची मंत्रालयात उद्योग क्षेत्र निरीक्षकपदी नुकतीच निवड करण्यात आली.

हातले (ता. चाळीसगाव) येथील शेतकरी रवींद्र नामदेव पाटील यांना दोन मुले व मुलगी. घरची जेमतेम परिस्थिती असताना त्यांनी आपल्या दोन मुलांसह मुलगी प्रियंकाच्या शिक्षणासाठी कुठेही कमी पडू दिले नाही. प्रियंका लहान असताना आपल्या आजोळी ब्राह्मणशेवगे (ता. चाळीसगाव) येथे मामांकडे त्यांच्या आग्रहामुळे शिकली. (Hatle daughter select as Industrial Sector Inspector in Administrative Service jalgaon news)

Sucess Story
Jalgaon News : शिवसेना ठाकरे गट, भाजपत घोषणायुद्ध

ब्राह्मणशेवगेत सहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर सातवीला चाळीसगावच्या आनंदीबाई बंकट मुलींच्या हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. हातले येथून दररोज बसने ये- जा करीत प्रियंकाने दहावीचे शिक्षण या शाळेत पूर्ण केले. त्यानंतर बारावीपर्यंतचे शिक्षण के. आर. कोतकर ज्युनिअर कॉलेजला घेतले. पदवीचे शिक्षण करण्यासाठी ती जळगावमध्ये दाखल झाली. या दरम्यान, घरातील सर्वांनीच प्रियंकाला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले.

जळगावात स्टेनोग्राफी शिकत असताना इतर मित्र मैत्रिणींच्या माध्यमातून प्रियंकाने स्पर्धा परीक्षा देण्याचे ठरवले. त्यानुसार, एकीकडे बी. एस्सी.चे शिक्षण घेत असताना राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचाही तिने अभ्यास सुरु ठेवला. सकाळी तीनला उठून ती अभ्यासाला बसायची.

हेही वाचा : प्रेमाला धर्म आहे...?

Sucess Story
Jalgaon News : फेब्रुवारीपासून जळगाव विमानतळावरून पुन्हा Take Off

चौथी नियुक्ती

प्रियंकाने पहिल्यांदा स्पर्धा परीक्षा दिल्यानंतर तिची सुरवातीला न्यायालयात लिपीक म्हणून नियुक्ती झाली. मात्र, अजून चांगल्या नोकरीची अपेक्षा असल्याने तिने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरुच ठेवला व महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. २०२० मध्ये ती उत्तीर्ण होऊन तिची मंत्रालयात महसूल सहायक म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर २०२२ मध्ये पुन्हा कर सहायक म्हणून संधी प्राप्त झाली. पुन्हा ही परीक्षा देऊन तिची मंत्रालयात ‘इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर’ म्हणजेच उद्योग निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. एवढे उच्च शिक्षण घेणारी प्रियंका ही हातले गावातील एकमेव ठरली आहे. ‘सीआरपीएफ’मधील जवान सचिन साळुंखे यांची ती पुतणी असून या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देण्याची त्यांनी

प्रियंका रवींद्र पाटील हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये तिचा महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रातील निरीक्षक या पदाच्या परीक्षेत चांगल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहे, तिची महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रात निरीक्षक या पदावर नुकतीच निवड करण्यात आली आहे, तिला चाळीसगाव येथील सीआरपीएफ जवान सचिन साळुंखे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे, ती आता सध्या महाराष्ट्र मंञालय महसूल विभागात सहायक लिपिक पदावर मुंबई येथे कार्यरत आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे, तिने या यशाचे श्रेय आपल्या आई वडिलांना व गुरुजनांना दिले आहे.

Sucess Story
Jalgaon News : जळगावातील सुवर्णबाजारात सोने 56 हजारांवर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com