Latest Marathi News | आयुष्यमान भारत’ला 4 वर्षे पूर्ण; लाभार्थ्यांना Health-Card | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ayushman Bharat news

Jalgaon : ‘आयुष्यमान भारत’ ला 4 वर्षे पूर्ण; लाभार्थ्यांना Health-Card

जळगाव : आयुष्यमान भारत योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेला चार वर्षे पूर्ण होतअसल्याने शुक्रवार (ता. २३) आयुष्यमान दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे. तसेच राज्यात १५ ते ३० सप्टेंबर या कालावधीत आयुष्यमान पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त जिल्ह्यात आरोग्य शिबिरे होणार असून, लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत आरोग्य कार्डचे वाटप करण्यात येणार आहे.

आयुष्यमान भारत- प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महाराष्ट्र शासनाची महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना या दोन्ही योजनांमार्फत जिल्ह्यामध्ये विविध रुग्णालयांमार्फत आरोग्य शिबिरांचे आयोजन केले आहे. या शिबिरांमध्ये एकत्रित आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांना कसा घेता येईल, याबद्दल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. (Health Card distribution to beneficiaries Ayushman Bharat completes 4 years Jalgaon news)

हेही वाचा: Bogus Medical Certificate Case : पगारे याचाही अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर

तसेच मोफत तपासणी, रुग्णांना त्यांचे आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट व ज्यांच्याकडे आयुष्यमान भारत योजनेचे पत्र आहे, त्यांना आयुष्यमान भारत कार्ड काढून देण्यात येणार आहे. या पंधरवड्यात संबंधित योजनांची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने शिबिर साखळीचे आयोजन करण्यात येणार आहे.

या योजनेसाठी जिल्ह्यात एकूण ४० रुग्णालये समाविष्ट आहेत. तरी या आरोग्य शिबिराचा लाभ सर्व लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन योजनेचे विभागीय व्यवस्थापक डॉ. वसीम शेख, विभागप्रमुख डॉ. सुमीत जैन, जिल्हा समन्वयक रोहित कारंडे, जिल्हाप्रमुख डॉ. अनुराधा वाडिले व सर्व आरोग्यमित्र यांनी केले आहे.

हेही वाचा: Lumpy Virus: लंपी व्हायरस कसा पसरतो?, लक्षणं काय? अशी घ्या प्राण्यांची काळजी

Web Title: Health Card Distribution To Beneficiaries Ayushman Bharat Completes 4 Years Jalgaon News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..