Healthy Tips: निरोगी जीवनासाठी ‘भारतीय बैठकीत’च करा जेवण! आहारतज्ज्ञांचा सल्ला

Indian Sitting style
Indian Sitting styleesakal

Healthy Tips : भारतीय संस्कृतीत जमिनीवर बसून एकाच स्थितीत जेवण करणे, ही योग्य पद्धत मानली जाते. मात्र, काही दशकांपासून टेबलावर बसून जेवण्याचा ट्रेंड सर्वव्यापी झाला आहे. शास्त्रीयदृष्ट्या हे वर्ज्य असल्याचे सांगण्यात येते.

लग्न आणि पार्ट्यांमध्ये उभे राहून जेवण करणे हा प्रकार आता नियमितपणे पाहायला मिळतोय. अशा परिस्थितीत कोणती खाण्याची पद्धत योग्य आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे. (Healthy Tips healthy life eat only in Indian sitting style Dietitian advice jalgaon)

खाण्यावर लक्ष केंद्रित

अन्न चावून खाणे महत्त्वाचे आहे. जमिनीवर बसून जेवत असाल, तर संपूर्ण लक्ष अन्नावर राहील. या स्थितीत तुम्ही अन्न नीट चावले, तर कोणतीही तक्रार होणार नाही.

रक्ताभिसरण चांगले होते

जमिनीवर बसून जेवल्याने रक्ताभिसरण उत्तम राहते. नसांमधील ताण कमी होतो. हृदयरोगाच्या रुग्णांसाठी या पद्धतीने जेवणे उपयुक्त ठरते. जमिनीवर बैठक मारल्याने ते एक प्रकारचे ‘पद्मासन’ किंवा ‘सुखासन’च होते.

त्यामुळे आपण त्या वेळी एका नैसर्गिक स्थितीत बसलेले असतो. याचा फायदा पचनक्रिया सुधारण्यावर होतो. शिवाय अतिरिक्त भोजन करणे आपोआप टाळले जाते.

त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. शिवाय हे एक प्रकरचे आसनच असल्यामुळे शरीराचा व्यायामही होतो. त्यामुळे शरीराची लवचिकताही वाढते.

हाडांमध्ये वेदना होणार नाहीत

जमिनीवर मांडी घालून बसून खाल्ल्याने, पाठीचा कणा आणि मान या दोन्ही भागांवर उत्तम ताण येतो. त्यामुळे शरीर आणि मनाला विश्रांती मिळते. तुम्हाला दीर्घकाळपर्यंत पाठदुखी किंवा हाडदुखीचा त्रास होत नाही..

Indian Sitting style
Health Tips: मेटाबॉलिझम वाढविण्याच्या सोप्या पद्धती, वजन कमी करण्यास होईल मदत

सांधेदुखीपासून आराम

जमिनीवर बैठक मारून जेवल्यामुळे आपल्याला गुडघे मोडून बसावे लागते. यामुळे गुडघ्यांचाही व्यायाम होतो. या पद्धतीने बसल्याने सांध्यांमधील लवचिकता, वंगण चांगले राहते. यामुळे जमिनीवर बसून जेवल्याने सांध्याच्या दुखण्यापासून आपल्याला दूर राहता येते.

जास्त खाण्यावर नियंत्रण

बसण्यापेक्षा खाण्यावर जास्त लक्ष केंद्रित केले जाणार असल्याने तुम्ही जास्त अन्न खाण्यापासून वाचाल. लक्षात ठेवा, की जास्त खाल्ल्याने पोट फुगणे आणि जडपणाच्या तक्रारी निर्माण होतात.

तुम्ही तुमच्या गरजेपेक्षा जास्त अन्न खात नाही, तेव्हा वजन वाढण्याची समस्या उद्भवणार नाही. लठ्ठपणा टाळला तर हृदयविकार, उच्च रक्तदाबाचा धोकाही कमी होतो.

जमिनीवर बसून खाणे का आहे फायदेशीर?

आपण जमिनीवर व्यवस्थित बसून जेवलो नाही, तर अन्नाचे पचन बिघडते आणि आपण अनेक आजारांना बळी पडू शकतो. अशा स्थितीत बहुतेक आहारतज्ज्ञ जमिनीवर मांडी घालून जेवण करण्याचा सल्ला देतात.

"जेवण करताना ते आपल्याला पचेल असेच असावे. निरेागी आहारात शक्यतोवर पोळीऐवजी भाकरीचा वापर करावा. काकडी, टोमॅटो, बीट, अशा सॅलडचा वापर अधिक करावा. जेवण करताना भारतीय बैठकीत बसून जेवण केल्याचे अनेक फायदे आहेत."

-समीक्षा पाटील, आहारतज्ज्ञ

Indian Sitting style
Monsoon Health Tips : पावसाळ्यात या भाज्यांपासून दूर राहीलेलंच फायद्याचं ठरेल!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com