Agriculture damage
Agriculture damageesakal

वादळी पावसाच्या तडाख्याने 18 गावांत 504 शेतकऱ्यांचे नुकसान

तापी नदीकाठ व सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गावांना बुधवारी वादळी पावसाचा जोरदार तडाखा बसला.
Published on

रावेर (जि. जळगाव) : रावेर तालुक्यात बुधवारी (ता. ८) झालेल्या वादळी पावसाच्या तडाख्यामुळे अठरा गावातील ५०४ शेतकऱ्यांचे ३४५ हेक्टर क्षेत्रातील केळी पिकाचे सुमारे १४ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल गुरुवारी (ता. ९) वरिष्ठांना सादर करण्यात आला. गुरूवारी सायंकाळी ३१ मेस झालेल्या वादळी पावसाच्या नुकसानीचे अंतिम वस्तुनिष्ठ पंचनामे सादर करण्यात आले. मात्र बुधवारी पुन्हा वादळी पावसाने तडाखा दिल्यामुळे महसूल व कृषी विभागाला बुधवारपासून पुन्हा पंचनामे करावे लागणार आहेत.

तालुक्यातील तापी नदीकाठ व सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गावांना बुधवारी वादळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. दरम्यान, बुधवारी सायंकाळी ३१ मेस झालेल्या वादळी पावसाच्या तडाख्यामुळे पंधरा गावातील ६०८ शेतकऱ्यांच्या ३०८ क्षेत्रातील पिकांचे १३ कोटी, ७३ लाख, ५२ हजार, ६६८ रुपयांचे नुकसान झाल्याचा वस्तुनिष्ठ पंचनामा बुधवारी सायंकाळी उशिरा सादर करण्यात आला. तर सायंकाळीच पुन्हा तालुक्याला वादळी पावसाने तडाखा दिल्याने केळी पिकाचे मोठे नुकसान झाले. रावेर तालुक्यातील गुरुवारी (ता. ९) अठरा गावशिवारातील ५०४ शेतकऱ्यांच्या ३४५ हेक्टर क्षेत्रातील केळी पिकांचे १३ कोटी ८० लाख रुपयांचा नुकसानीचा प्राथमिक अहवाल वरिष्ठांना पाठविण्यात आला आहे.

Agriculture damage
वादळात वीजतारा कोसळून विजेच्या धक्क्याने बालक ठार

नुकसानीचा प्राथमिक अहवाल गुरुवारी (ता. ९) सादर करण्यात आला आहे.

गाव.....शेतकरी संख्या.....बधित हेक्टर क्षेत्र....एकूण नुकसान

सावखेडा बुद्रुक.....५३.......४५.००.......१ कोटी ८० लाख

सावखेडा खुर्द.......१०........६.००............२४ लाख

खिरोदा प्र. यावल.....३५........२५..............१ कोटी

कळमोदा.............१२..........०७.............२८ लाख

ऐनपूर.................२७..........२०..............८० लाख

धामोडी...............३०...........२५............१ कोटी

कोळोदा...............७०...........५५............२ कोटी २० लाख

सुलवाडी..............३५...........२०.............८० लाख

कांडवेल..............११०..........७०..............२ कोटी ८० लाख

वाघाडी...............१५............०७..............२८ लाख

शिंगाडी...............३५.............२०..............८० लाख

भामलवाडी...........०७.............०४.............१६ लाख

Agriculture damage
आला रे आला! पुण्यात ढगांच्या गडगडाटासह पावसाची दमदार हजेरी

तिड्या...............०२.............०२...............८ लाख

पुरी...................०४.............०३...............१२ लाख

गोलवाडे...............०५............०३...............१२ लाख

रोझोदा.................३५.............२२..............८८ लाख

बोरखेडासिम...........१२............०७...............२८ लाख

वडगाव................०८..............०४..............१६ लाख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com