
आला रे आला! पुण्यात ढगांच्या गडगडाटासह पावसाची दमदार हजेरी
पुणे : मॉन्सून कोकणात दाखल झाला असून संपूर्ण महाराष्ट्र तो आता व्यापून टाकणार असल्याचं हवामान विभागानं सकाळी जाहीर केलं होतं. त्यानंतर संध्याकाळच्या सुमारास पुणे शहर आणि जिल्ह्यातील काही भागात ढग दाटून आले आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली. यामुळं नागरिकांचा चांगलाच गोंधळ उडालेला पहायला मिळाला. (Rain Update Heavy rains with thunderstorms in Pune city and suburban)
हेही वाचा: दिल्ली : नुपूर शर्मांच्या निषेधासाठी जामा मशीदीजवळ उसळली गर्दी
दिवसभर शहरात चांगलाच उकाडा जाणवत होता. सकाळी स्वच्छ उन पडलं होतं त्यामुळं तापमानही जास्त जाणवत होतं. पण दुपारनंतर वातावरणात बदल होऊन ढगाळलेलं वातावरण तयार झालं. संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाच्या सरी कोसळायला सुरुवात झाली. सकाळी सूर्यनारायणं चांगलं दर्शन होत असल्यानं पावसाचा अंदाज येत नसल्यानं घराबाहेर पडलेल्या नागरिकांची मात्र संध्याकाळी घरी परतताना चांगलीच त्रेधातिरपिट उडालेली पहायला मिळाली.
हेही वाचा: साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचा नुपूर शर्मांना पाठिंबा; म्हणाल्या, तर मी पण...
लहान मुलांनी साजरा केला आनंद
शहरात दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. या पहिल्याच पावसात लहान मुलांनी आनंद साजरा केला. गुलटेकडी मार्केट यार्ड भागातील मीनाताई ठाकरे वसाहत, डायस प्लॉट, इंदिरा नगर, प्रेमनगर वसाहत, आंबेडकर नगर भागातील अनेक मुलांनी पावसात भिजत आनंदोत्सव साजरा केला. कॅनॉल लगत असणाऱ्या डायस प्लॉट भागातील लहान मुले धोकादायकरित्या खेळताना आढळली. त्याचबरोबर उंड्री, पिसोळी, हांडेवाडी, औताडेवाडी, वडाचीवाडी, महंमदवाडी, होळकरवाडी, शेवाळेवाडी परिसरात पहिल्या पावसात चिमुकल्यांनी भिजण्याचा आनंद लुटला.
Web Title: Rain Update Heavy Rains With Thunderstorms In Pune City And Suburban
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..