Jalgaon Crime News : गणेश कॉलनीत हायप्रोफाईल वेश्या व्यवसाय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Jalgaon Crime News : गणेश कॉलनीत हायप्रोफाईल वेश्या व्यवसाय

जळगाव : शहरातील मध्यवस्तीत गणेश कॉलनी परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये चक्क फ्लॅट खरेदी करून वेश्या व्यवसाय चालविला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराबाबत अनेक दिवसांपासून कुरबुरी होत्या.

मात्र, बुधवारी (ता. ११) सकाळी सहाला अपार्टमेंटच्या इतर रहिवाशांनी तरुणी व तिच्यासोबत आलेल्या आंबट शौकीनला पकडून जिल्‍हापेठ पोलिसांच्या स्वाधीन केले. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

गणेश कॉलनीतील फ्लॅटमध्ये एक जोडपे शिरल्याचे काही रहिवाशांनी बघितले. याबाबत महिलांमध्ये कुरबूर झालील तर इतर रहिवाशांनी जिल्‍हापेठ पोलिसांना घटना कळविल्यावर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

फ्लॅटमध्ये जाऊन पोलिसांनी चौकशी करत माहिती घेतली. आपार्टमेंटमधील संबंधित फ्लॅटमालकाला इतर रहिवाशांनी तत्काळ घर खाली करून जाण्याबाबत दरडवल्याचेही सांगण्यात आले. (High profile prostitution business in Ganesh Colony two people entered flat caught by citizens and handed over to police Jalgaon News)

हेही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

हेही वाचा: Jalgaon News : ‘फायनान्स’ कार्यालयाची तोडफोड प्रकरण भोवले; तालुका प्रमुखा विरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल

मिळतो रग्गड पैसा

कमी श्रमात जास्त पैसा कमाविण्याच्या नादात रहिवासी परिसरात फ्लॅट घेऊन, असे अनअधिकृत धंदे चालविले जात असल्याचे वारंवार समोर येत आहे. नवीपेठेतील मध्यवर्ती बाजारपेठेत वेश्या व्यवसाय चालविला जात असल्याचे यापूर्वी उघडकीस आले होते. ही मंडळी व्हॉट्‌सॲपवरून संपर्क करून आंबट शौकीनांना हेरतात.

तासाभराचे दोन ते पाच हजारांपर्यंत रक्कम ठरली असल्याने कुठल्याही थराला जाण्यास ही मंडळी तयार असते. ठरल्यावेळेत सिग्नल दिल्यानंतर उच्चभ्रू वस्तीत ही मंडळी गैरकृत्य करतात. असाच प्रकार गणेश कॉलनीतील अपार्टमेंटमध्ये सुरू असल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले. मात्र, अपार्टमेंटचे नाव प्रसिद्ध करू नका, अशीही विनंती येथील रहिवाशांनी केली.

"गणेश कॉलनीतील त्या अपार्टमेंटमधील रहिवाशांनी वेश्या व्यवसाय चालविला जात असल्याच्या संशयावरून भ्रमणध्वनीवरून कळविले होते. पोलिस पथकही घटनास्थळी जाऊन चौकशी करनू आले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करणार आहेत."

-किशोर पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक

हेही वाचा: Nashik Accident News : महामार्गावर शहर गुन्हे शाखेच्या वाहनाला अपघात

टॅग्स :JalgaoncrimeProfileshigh