Nashik Accident News : महामार्गावर शहर गुन्हे शाखेच्या वाहनाला अपघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident News

Nashik Accident News : महामार्गावर शहर गुन्हे शाखेच्या वाहनाला अपघात

नाशिक : मुंबई- आग्रा महामार्गावरील गोंदे औद्योगिक वसाहतीजवळ शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या वाहनाला अपघात झाला. या अपघातामध्ये तीन पोलिस कर्मचारी जखमी झाले असून, त्यांच्यावर नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सदर अपघात बुधवारी (ता. ११) सकाळी घडला. पोलिस वाहनातील कर्मचाऱ्यांनी सीटबेल्ट लावलेला असल्याने अपघातानंतर दोन पलट्या वाहनाने घेतल्यानंतर सुदैवाने तिघे बचावले आहेत. याप्रकरणी घोटी पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. (Accident involving a city crime branch vehicle on the highway Nashik Accident News)

हेही वाचा: Nashik News : दुभाजकीवर दुचाकी आदळून 2 तरुण ठार; एक गंभीर

चालक संतोष भगवान सौंदाणे (५७), कर्मचारी सचिन परमेश्वर सुपले (४३), रवींद्र नारायण चौधरी (३७) हे तिघे पोलिस अंमलदार जखमी झाले आहेत. हे तिघे मुंबईच्या दिशेने न्यायालयीन कामकाजानिमित्त जात होते. तिघांनीही ‘सीटबेल्ट’ लावलेला होते. त्यामुळे त्यांना ते गंभीर दुखापतीपासून बचावले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.

नाशिकमधील खासगी रुग्णालयात वैद्यकीय चाचण्या व उपचारांसाठी त्यांना दाखल करण्यात आलेले आहे. घटनेची माहिती मिळताच घोटी व शहर गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अंमलदारावर वाडीवऱ्हे आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करण्यात आले.

अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी मदतकार्य केले. अपघातामध्ये पोलिस वाहनासह क्रेटा कारचेही नुकसान झाले आहे. तर, धडक बसलेला तिसरा कारचालक कारसह घटनास्थळावरून पसार झाला आहे.

हेही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

हेही वाचा: Jalgaon News : शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने विद्यार्थिनी गंभीर जखमी ,विद्यार्थी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर !

हे पथक गंगापूर पोलिस ठाण्यातील भूखंडांच्या एका गुन्ह्यातील न्यायालयीन कागदपत्रे घेऊन मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यासाठी निघाले होते. गोंदे एमआयडीसीजवळ असताना शेजारून जाणाऱ्या भरधाव वेगातील क्रेटा कारने दुसऱ्या कारला धडक दिली.

सदर कार पोलिसांच्या वाहनावर आदळली. त्या वेळी चालक सैंदाणे यांनी दुभाजकाच्या दिशेने वाहन दाबले. मात्र, पाठीमागून क्रेटाची जोरात धडक बसल्याने पोलिसांच्याही वाहनाचा अपघात झाला आणि वाहनाने दोन पलटी घेतल्या. याप्रकरणी घोटी पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा: Nashik Municipal News : जाहिरात शुल्क वाढीचा निर्णय ठराविक ठेकेदारांसाठी