Jalgaon News : ..तर संपूर्ण 7 किलोमीटरचा महामार्गच खोदावा लागेल! चौपदरी मार्गाची वर्षातच चाळण

Road repair work in progress on the highway in front of Government Technical College on Thursday.
Road repair work in progress on the highway in front of Government Technical College on Thursday.esakal

Jalgaon News : महामार्गावरील काही ठिकाणांवर वारंवार ठिगळ लावून, पॅचवर्क करुनही खड्ड्यांची समस्या दूर झालेली नाही. आता महामार्ग दुरुस्तीसाठी आयटीआयसमोरील दोनशे मीटरचा पॅच पूर्ण खोदून नव्याने करण्यात येणार आहे.

मात्र, हा संपूर्ण महामार्गच सदोष पृष्ठभागावर तयार करण्यात आला असून, कामही दोषपूर्ण असल्याने काही दिवसांनी पूर्ण महामार्गच खोदावा लागतो की काय? अशी शक्यता व्यक्त होतेय.

शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे चौपदरीकरण कसेतरी उरकण्यात आले. मात्र, वर्षभरातच या महामार्गाची चाळण झाली. (highway in bad condition after year nashik news)

दुरवस्थेचे चित्र

गेल्या वर्षी पहिल्याच पावसात महामार्गावरील भुयारी मार्गांत (अंडरपास) पाणी साचले. भुयारी मार्गाला लागून केलेल्या सेवा रस्त्यांवरही तलाव साचले. महामार्गावर दुतर्फा दुभाजकालगतच मोठमोठे खड्डे पडले. अग्रवाल हॉस्पिटल ते प्रभात चौक, दादा वाडीसमोरील उड्डाणपुलावरही खड्डे पडले. तर काही भाग खचल्याचे दिसून येते. आकाशवाणी, इच्छादेवी व अजिंठा चौकातील सर्कलचा सत्यानाश जळगावकरांच्या डोळ्यासमोर आहेच. कालिंका माता चौकात दोन्ही बाजूला पाण्याचे डबके साचते.

पश्‍चातबुद्धीचा नमुना

हे थोडे नव्हते म्हणन की काय, संपूर्ण महामार्गाचे काम झाल्यानंतर त्यावर पथदीप लावण्याची बुद्धी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला सुचली. त्यांच्या कामात हा घटक समाविष्ट नसल्याने महापालिकेकडे हे ‘पाप’ सोपविण्यात आले.

मनपा प्रशासनानेही नेहमीप्रमाणे ठेकेदाराचे हित जपत काम दिले. पथदीप लावणाऱ्या ठेकेदाराने मनमानी पद्धतीने दुभाजक तोडत, मधून केबल टाकत कसेबसे हे काम उरकले. लावलेल्या पथदिव्यांपैकी अनेक तर आजही बंदच आहेत. या महामार्गावरील पथदीप म्हणजे पश्‍चातबुद्धीचा सर्वांत वाईट नमुना आहे..

Road repair work in progress on the highway in front of Government Technical College on Thursday.
Jalgaon News : रस्त्यांची कामे तातडीने करा महापालिका आयुक्तांचे सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र

दुरुस्तीची मालिका सुरुच

यंदा अत्यल्प पाऊस होऊनही महामार्गाची पुन्हा वाट लागली. आयटीआयसमोरील टप्प्यात तर पूर्ण मार्ग खचल्याचे दिसते. त्याची दुरुस्ती आता सुरु आहे. वारंवार पॅचवर्क करुनही खड्डे पडतातच, म्हणून या टप्प्यातील दोन-तीनशे मीटरचा मार्ग पूर्ण खोदून नव्याने करण्यात येत आहे. मात्र, हेच चित्र संपूर्ण महामार्गाचे असल्याने काही दिवसांनी, महिन्यांनी संपूर्ण महामार्गच खोदावा लागतो की काय, अशी स्थिती आहे.

पृष्ठभागामुळे रस्ता खचतोय

राष्ट्रीय महामार्ग शहराच्या ज्या क्षेत्रातून गेला आहे, तेथे कधीकाळी काळ्या जमिनीची शेती होती. त्यामुळे या भागात एक- दोन फुटापर्यंत मुरमाड जमीन आढळून येत असली, तरी ती आधी अस्तित्वात असलेल्या महामार्गासाठी केलेला बेस होता. त्याखाली काळ्या मातीचीच भुसभुशीत जमीन आहे. थोडे खोलवर खोदल्यानंतर हा प्रकार लक्षात येतो.

पृष्ठभागाच्या समस्येमुळे महामार्ग बऱ्याच ठिकाणी खचतो अथवा त्यावर खड्डे पडतात, असे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. असे असले, तरी ती शक्यता लक्षात घेऊनच महामार्गाचे काम व्हायला हवे होते, असेही तज्ज्ञ सांगतात.

Road repair work in progress on the highway in front of Government Technical College on Thursday.
Jalgaon News : जळगावच्या रस्त्यावर धावताय जिवंत बॉम्ब! गॅसकिट ऑटोरिक्षांतील प्रवाशांचा जीव धोक्यात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com