Jalgaon News : जळगावच्या रस्त्यावर धावताय जिवंत बॉम्ब! गॅसकिट ऑटोरिक्षांतील प्रवाशांचा जीव धोक्यात

Flames rising after a running passenger rickshaw caught fire near the Pimprala railway flyover on Thursday.
Flames rising after a running passenger rickshaw caught fire near the Pimprala railway flyover on Thursday.esakal

Jalgaon News : शहरातील रस्त्यांवर जवळपास पाच हजारावर प्रवासी रिक्षा धावत आहेत. महागडे पेट्रोल-डिझेल परवडत नसल्याने गॅस किट ऑटो रिक्षाची मागणी वाढली. थेट कंपन्यांनीही सिएनजी-एलपीजी किटसह नव्या रिक्षा बाजारात उतरवल्या.

याच ऑटोरिक्षा अकुशल मेकॅनीककडून दुरुस्ती आणि अघोरी पद्धतीने गॅस फिलींगमुळे जिवंत बॉम्ब समान झाल्या आहेत. धावत्या वाहनांनी पेट घेऊन मोठी जिवीत हानी झाल्यावर कदाचीत प्रशासनाला काहीतरी करण्याची उसंत मिळेल. तोपर्यंत जीव धोक्यात घालून प्रवास करणाऱ्या निष्पाप नागरिकांची ससेहोलपटच होणार, हे मात्र निश्‍चित.

पिंप्राळा रोडवर गुरूवारी (ता. १२) दुपारी एका धावत्या प्रवासी रिक्षाने पेट घेतला. गॅसगळतीमुळे रिक्षाने पेट घेतल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. (Life of passengers in gas kit auto rickshaw in danger jalgaon news)

शहरात गेल्या चाळीस वर्षांत सार्वजनीक प्रवासी वाहतुक यंत्रणाच विकसीत होऊ न शकल्याने ऑटोरिक्षा आणि दुचाकींची संख्या कमालीची वाढत गेली. त्यात इंधनवाढीचा फटका बसत असल्याने रिक्षा तयार करणाऱ्या कंपन्यांनी स्वतःच सीएनजी-एलपीजी गॅसवर धावणाऱ्या ऑटोरिक्षा बाजारात उतरवल्या.

शहरातील जवळपास नव्वद टक्के ऑटेारिक्षा एलपीजी गॅसवर धावत आहेत. सुरवातीला पेट्रोल रिक्षात विनापरवाना गावठी गॅरेजवाल्यांकडून गॅसकिट बसवुन घेतले जात असे. आता मात्र कंपन्याच अधिकृत गॅसकीट पुरवत असल्याने धोका संपला, असा ठाम विश्‍वास रिक्षाचालक, प्रवासी अन्‌ उपप्रादेशीक परिवहन खाते व प्रशासनाचाही झाला आहे. प्रत्यक्षात मात्र गॅसकीटवर धावणाऱ्या या ऑटोरिक्षाच आता जिवंत बॉम्बप्रमाणे नागरिकांच्या जिवावर उठल्यात की काय अशी परिस्थीती उद्‌भवण्याची वेळ आल्याचे आजच्या अपघातावरुन स्पष्ट होते.

अनधीकृत गॅसफिलर केंद्र

जिल्‍हा पोलिस प्रशासनाच्या आशिर्वादाने शहरात गल्लोगल्ली स्वयंपाक गॅस सिलिंडरमधुन ऑटोरिक्षात अनधिकृतपणे गॅस भरुन देणारे केंद्र चालवले जात आहेत. प्रत्येकच पोलिस ठाण्याच्या हद्दीत असे अनधीकृत गॅसपंप असून, त्यांना पोलिसांचाच अभय आहे. स्वयंपाक गॅस सिलिंडरमधुन मिळणारा गॅस नव्वद रुपये किलोप्रमाणे मिळतो.

तर पंपावर त्यासाठी दीडपट किंमत आकारली जाते. गणेश कॉलनी येथे एक आणि नशिराबाद रोडवर दुसरे, चिंचोली गावाजवळ तीसरे असे तीन गॅसपंप शहरात असून, गणेश कॉलनीचा पंप बंद पडल्याने रिक्षाचालकांनी अनधीकृत गॅस भरणा केंद्रांतूनच इंधन मिळविणे सुरु केले आहे.

Flames rising after a running passenger rickshaw caught fire near the Pimprala railway flyover on Thursday.
Gharkul Scam News : दोषी 48 माजी नगरसेवकांकडून वसुली करावी; मनपा लेखा परिक्षक विभागाचे बांधकाम विभागास पत्र

असा धोका..

अनधिकृत गॅस फिलींग केंद्रांवर विद्युत मोटारीद्वारे स्वयंपाकाचा गॅस सिलिंडरमधुन ओढला जातो. नंतर तोच गॅस ऑटोरिक्षा, कारच्या इंधन टाकीत भरला जातो. अशास्त्रीय पद्धतीने एका टाकीतून दुसऱ्या टाकीत गॅस टाकण्याची ही प्रक्रीया अत्यंत धोकादायक आहे. वाहनाच्या गॅस टाकीवरील नोझल बळजबरीने बसवलेले असल्याने त्यातूनही लिकेजचे प्रमाण वाढते. अशात जागेवर स्फोट झाला, तर जवळपास उभ्या प्रत्येकालाच जीव गमवावा लागेल.

गावठी मॅकेनीककडून छेडखानी

जवळपास सर्वच ऑटोरिक्षा या गॅसकिटवर धावत आहेत. बजाज, टिव्हीएस, महिंद्रा, पॅजो अशा विवीध कंपन्यांची वाहने सध्या रस्त्यावर धावत असून, त्यात प्रवासी वाहनांसाठी गॅसकिटला प्राधान्य आहे. पुर्वी पेट्रोल- डिझेल वाहनांची दुरुस्ती करणारे तेच गॅरेज आणि तेच छोटूभाऊ, पिंटूभाऊ, वस्ताद पद्धतीचे मॅकेनीक आता गॅसकिट रिक्षांची दुरुस्ती करतात.

परिणामी इंजीनला गॅस पुरवठा करणाऱ्या नळ्या, नोझल, ब्लॉक-हेड आदींमध्ये लिकेज तर नाही ना, याची ठोस खात्री करता येत नाही. वारंवार गॅस गळतीच्या तक्रारी येत असल्याने कोणी कायपण शोध लावून कंपनीच्या फिटींग्जसोबत छेडखानी करत असल्याचेही एका मॅकेनीकने सांगीतले.

इंधनदर

पेट्रोल : १०७

एलपीजी गॅस : १००

सिलेंडचा गॅस : ६५

शहरातील ऑटोरिक्षा : ९ हजारावर

प्रवासी रिक्षा : ५ हजार ५००

माल वाहतूक : ३ हजार ५००

Flames rising after a running passenger rickshaw caught fire near the Pimprala railway flyover on Thursday.
Jalgaon News : शिवभोजन केंद्रात अरेरावी, अस्वच्छता; 30 शिवभोजन चालकांना नोटीस

पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाजवळ धावती प्रवासी रिक्षा पेटली

पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाजवळ धावत्या प्रवासी रिक्षाने पेट घेतल्याची घटना गुरूवारी (ता. १२) दुपारच्या सुमारास घडली. महापालिका अग्निशमन विभागाच्या पथकाने धाव घेवून ही आग विझविण्यात आली. तोपर्यंत प्रवासी रिक्षा जळून खाक झाली. ही आग कोणत्या कारणामुळे लागली याची माहिती समोर आलेली नाही.

याबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातून पिंप्राळ्याच्या दिशेने ऑटो रिक्षा (एमएच १९, व्ही ३४८८) ही प्रवासी घेवून निघाली होती. शिव कॉलनी-पिंप्राळा येथील उड्डाणपुलाच्या खालीच अचानक धावत्या ऑटोरिक्षाने पेट घेतला. चालकाला गाडीतून धुर निघत असल्याचे कळताच त्याने वाहन थांबवले अन्‌ रिक्षाने पेट घेतला. प्रवाशांनीही तातडीने खाली उतरुन जीव वाचवला. धावती रिक्षा पेटल्याचे समजताच अग्निशमन पथकातील युसुफ पटेल, भारत बारी, रविंद्र बोरसे आणि तेजस जोशी बंबासह घटनास्थळी धडकले. पथकाने अवघ्या २० मिनीटांत पाण्याचा जोरदार मारा करत आग अटोक्यात आणली.

चालक पसार

ऑटो रिक्षाने पाठीमागून पेट घेतल्याचे कळताच रिक्षातील प्रवासी जीव वाचवुन बाजुला होत नाही तोवर, रिक्षाचालकाने वाहन सोडून रेल्वे रुळाकडून पळ काढल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. रामानंदनगर पेालिसांनी घटनेची माहिती घेतली असून, याबाबत उशिरापर्यंत कुठलीच नोंद होवु शकली नव्हती.

Flames rising after a running passenger rickshaw caught fire near the Pimprala railway flyover on Thursday.
Jalgaon News : रस्त्यांची कामे तातडीने करा महापालिका आयुक्तांचे सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com