
जळगाव : हक्काच्या घरासाठी महिलेची परवड
पाचोरा (जि. जळगाव) : सांगवी प्र. लो. (ता. पाचोरा) येथील मातंग समाजाच्या मागासवर्गीय बेघर परितक्त्या महिलेची घरकुल योजनेच्या लाभासाठी जाणीवपूर्वक परवड केली जात असून, महिलेने न्यायासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे याचना केली आहे. (Latest Marathi News)
रेखा कांबळे यांना शासनाच्या घरकुल योजनेचे घरकुल मंजूर झाले असून, जागाही मंजूर आहे. या अगोदर गावठाण जागेमध्ये अनेकांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात आला आहे. परंतु श्रीमती कांबळे यांना मात्र ग्रामपंचायतीमार्फत घरकुल योजनेचा लाभ देण्यास टाळाटाळ करून अन्याय केला जात आहे. याबाबत न्याय मिळण्यासाठी श्रीमती कांबळे यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे निवेदन देऊन घरकुलाबाबत याचना केली आहे. निवेदनाच्या प्रती प्रांताधिकारी, गटविकास अधिकारी यांनाही देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा: पी.एम. किसान नव्या नोंदणीसाठी मंगळवेढ्यात टोलवाटोलवी
हेही वाचा: शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावलेंच्या मुलाला मारण्याची धमकी
Web Title: House Was Approved In The Awas Yojna Woman Did Not Get The House In Jalgaon District
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..