
Jalgaon Crime News : पैशांसाठी पतीकडून विवाहितेचा छळ
Jalgaon News : पिंप्राळा येथील मुंदडानगरातील विवाहितेला माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत मारहाण व दमदाटी केल्याप्रकरणी शुक्रवारी (ता. २६) रात्री नऊला रामानंदनगर पोलीस ठाण्यात चौघांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
पिडीत विवाहितेने रामानंदनगर पोलीसांत दिलेल्या तक्रारी नुसार, मुंदडानगर येथील माहेरवासीन मयुरी मोहन तोंडे यांचा २००७मध्ये कोथरूड (पुणे) येथील मोहन बबन तोंडे यांच्याशी विवाह झाला आहे. (husband Harassed married wife for money Jalgaon Crime News)
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
लग्नानंतर पती मोहन याने विवाहितेला माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली. पैसे आणले नाही म्हणून मारहाण, शिवीगाळ व दमदाटी केली.
या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्यात्यानंतर त्यांनी शुक्रवारी रात्री नऊला पतीसह सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दिली.
त्यानुसार पती मोहन तोंडे, सासरे बबन तोंडे, सासू आशाबाई आणि दिर किरण तोंडे (सर्व रा. कोथरूड, पुणे) यांच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलीस नाईक प्रशांत पाठक तपास करीत आहेत.