हुतात्मा एक्स्प्रेस, पॅसेंजर गाड्या त्वरित सुरु करा; PAC समितीचे निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indian Railway

हुतात्मा एक्स्प्रेस, पॅसेंजर गाड्या त्वरित सुरु करा; PAC समितीचे निवेदन

भुसावळ (जि. जळगाव) : कोरोना (Corona) काळात अनेक रेल्वेगाड्या बंद करण्यात आल्या होत्या. मात्र, आता जनजीवन सामान्य झाले आहे. तरीही अनेक रेल्वेगाड्या अद्यापही बंद आहेत. त्यामुळे प्रवासी आणि चाकरमान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ही समस्या दूर करण्यासाठी हुतात्मा एक्स्प्रेसह पॅसेंजर गाड्या त्वरित सुरु करण्याची मागणी रेल्वे डीआरयुसीसी सदस्य अनिरुध्द‎ कुलकर्णी यांनी केला आहे.

जनरल तिकीटही सुरू व्हावे

‎रेल्वे बोर्डाच्या प्रवासी सुविधा समितीने ‎(पीएसी समिती) भुसावळ स्थानकावर पाहणी केली असता, श्री. कुलकर्णी यांनी निवेदनाद्वारे‎ मागणी केली आहे.‎ यात नमूद करण्यात आले की, भुसावळहून सुटणारी हुतात्मा एक्स्प्रेस कोरोना काळापासून बंद आहे आणि आता जनजीवन पूर्ववत झाले आहे. त्यामुळे लवकरात लवकर हुतात्मा एक्स्प्रेस सुरू करावी. सर्व पॅसेंजर रेल्वे आणि जनरल तिकीट हे बंद आहे तेसुद्धा सुरू करण्यात यावे. भुसावळ ते इगतपुरी धावणाऱ्या मेमो ट्रेनचे डबे वाढविण्यात यावे. त्या गाडीला तो एक्स्प्रेस गाडीचा दर्जा काढून, पॅसेंजर गाडीचा दर्जा द्यावा. त्याचे भाडेदर कमी करावे जेणेकरून सामान्य प्रवाशांना याचा लाभ होईल.

हेही वाचा: Jalgaon : 42 कोटींच्या रस्त्यांचा खेळ; खड्ड्यामुळे नागरिक त्रस्त

पार्किंगमधील लूट थांबवा

शहरातील रेल्वे स्थानकावरील कार, दुचाकी पार्किंगमध्ये प्रवाशांकडून‎ निर्धारित मुल्यापेक्षा अधिक पार्किंग‎ शुल्क वसूल केले जात आहे. या‎प्रकरणी वारंवार तक्रारी केल्यानंतरही‎ दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप अनिरुध्द‎ कुलकर्णी यांनी केला आहे. रेल्वेच्या पार्किंग साउथ साईड‎ आणि नॉर्थ साईड येथे संबंधित ठेकेदार‎ जो कोणी प्रवासी कार पार करतो तो‎ ठेकेदार चढ्या दराने कार पार्किंगचे‎ शुल्क वसूल केले जात आहे. याबाबत चार वेळेस रेल्वे प्रशासनाला तक्रार‎ केली. त्यानुसार एका ठेकेदारास ५ हजार रुपये दंड रेल्वे प्रशासनाने लावून‎ कारवाई केली.

हेही वाचा: रस्ते अपघातातील जखमींना वाचविणारा ‘रावेर पॅटर्न’ला सुरुवात होणार

सुरक्षा भिंत उभारा

लोखंडी सातारा पुलाजवळ आऊटरला संरक्षण भिंत नसल्यामुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचा वापर वाढला आहे. त्यामुळे याठिकाणी संरक्षण भिंत बांधण्यात यावी. रेल्वे स्टेशन ते आरपीडीपर्यंत रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. तो तत्काळ दुरुस्त करण्यात यावा अशी मागणीही करण्यात आली आहे.

Web Title: Hutatma Express Passenger Trains Starts Immediately Statement Of Pac Committee

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :CoronavirusJalgaonrailway
go to top