Jalgaon News : भुसावळचा इतिहास ‘खून का बदला खून’; पोलिस यंत्रणाही त्यापुढे हतबल!

Crime
Crime sakal

जळगाव : जिल्ह्यात भुसावळ, अमळनेर, चाळीसगाव आणि जळगाव शहराची गुन्हेगारी आणि गँगवारची पार्श्वभूमी तशी रंजक आहे.

प्रत्येक गावचा जसा इतिहास, तसाच गुन्हेगारीचा इतिहासही (History) खूप थरारक असाच आहे. (If someone has killed in city no one can remain silent without taking revenge jalgaon crime news)

भुसावळ म्हटले, की इथे ‘खून का बदला खून’ हे पॅटर्न ठरलेलेच. त्यामुळे काहीही केले, तरी पोलिस यंत्रणा याठिकाणी हतबल ठरत असल्याचा अनुभव आहे.

एखाद्याची हत्या झाली असेल, तर त्याच्या पश्चात बाप-भाऊ किंवा मित्र कोणी का असेना त्या घटनेचा बदला घेतल्याशिवाय शांतच राहू शकत नाही, हे भुसावळच्या शेंबड्या पोरालाही माहिती असल्याने पोलिस अनभिज्ञ असूच शकत नाही.

पहिलवान मोहन बारसे हत्या प्रकरणात त्यांच्या कुटुंबीयांनी एकाचा भुसावळ न्यायालयात खातमा केला, तर दुसऱ्याला चालत्या बसमध्ये गाठले. २०१७ मध्ये रेल्वे कर्मचारी सलीम शेख शेरू यांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

Crime
Jalgaon Fraud Crime : बिझनेस लोनच्या नावे 24 लाखांत गंडविले

मुलगा हाशीम याने त्याच वेळेस पोलिस ठाण्यात सर्वांदेखत बोलून दाखविले होते, ‘ये, खून का बदला खून होगा अन्‌ दीडच वर्षात नगरसेवक रवींद्र बाबूराव खरात ऊर्फ हंप्या यांच्या घरावर हल्ला झाला.

यात रवींद्र खरात यांचा भाऊ सुनील, मुलगा सागर, रोहित यांच्यासह त्यांचा मित्र सुनील ऊर्फ सोनू गजरे याच्यावर गोळीबार, चॉपर हल्ला करून खून करण्यात आला.

त्यानंतर धम्मप्रियची जामिनावर सुटताच बदला घेत हत्या करण्यात आल्याने त्याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी दुर्धर आजाराने ग्रस्त पित्याने बदल्याचा विडा उचलला. सोमवारी (ता. २०) जळगावातील पहिला प्रयत्न अयशस्वी झाला आहे. घडलेल्या घटना परत परत तशाच सिनेस्टाइल घडून येणार, पोलिस असो की प्रशासन, हा खून का बदला खून थांबवू शकत नाही, हे मात्र निश्‍चित.

Crime
Jalgaon News : थरार एखाद्या चित्रपटाला शोभणारा; बदल्यासाठी पिस्तूलसह बुरखा घालत थेट कोर्टात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com