Jalgaon News : थरार एखाद्या चित्रपटाला शोभणारा; बदल्यासाठी पिस्तूलसह बुरखा घालत थेट कोर्टात

Police arresting Burkhadhari Manohar
Police arresting Burkhadhari Manoharesakal

जळगाव : भुसावळ येथील दोन टोळक्यांच्या वादात झालेल्या मुलाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी अकरा महिन्यांनंतर सुटलेल्या तरुणाची (Youth) नशिराबादला महामार्गाच्या पुलाखाली गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. (for revenge of son murder father gone Straight to court wearing a veil with pistol jalgaon crime news)

त्या हत्येचा बदला घेण्याचा डाव पोलिसांनी सोमवारी (ता. २०) हाणून पाडला. न्यायालयात बुरखा घालून आलेल्या दोघा पिस्तूलधारींपैकी एकास पोलिसांनी अटक केली, तर दुसरा पळून गेला.

भुसावळ शहरात तीन वर्षांपूर्वी लहान मुलांच्या भांडणातून दोन गट आपसांत भिडल्यानंतर त्यातून धम्मप्रिय मनोहर सुरळकर, समीर ऊर्फ कल्लू अजय बांगर, शुभम पंडित खंडेराव, आशिष ऊर्फ गोलू अजय बांगर अशा चौघांनी ११ ऑक्टोबर २०२० ला कैफ शेख झाकिर या सतरावर्षीय युवकाच्या डोक्यात रॉड घालून त्याची हत्या केली होती.

या गुन्ह्यात मुख्य संशयित धम्मप्रिय सुरळकर (१८, रा. पंचशीलनगर) याला पोलिसांनी अटक केली होती. त्याची कारागृहात रवानगी झाल्यानंतर अकरा महिन्यांनी तो जामिनावर सुटला.

२२ सप्टेंबर २०२१ ला तो वडील मनोहर आत्माराम सुरळकर (४५) यांच्यासोबत दुचाकीने (एमएच १९ एव्ही ९६५६) घरी भुसावळकडे जात असता नशिराबाद उड्डाणपुलाजवळ सुनसगाव रस्त्यावर थांबलेल्या तिघांनी दोघांवर पिस्तूल आणि चॉपरने हल्ला चढविला होता.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

Police arresting Burkhadhari Manohar
Jalgaon News : गो-तस्करीच्या संशयातून ट्रक पेटवणारे अटकेत

यात धम्मप्रियचा गोळीबारात जागीच मृत्यू झाला. वडील मनोहर सुरळकर गंभीर जखमी झाले होते. नशिराबाद पोलिस ठाण्यात दाखल या खुनाच्या गुन्ह्यात पोलिसांनी चौघांना अटक केली होती. त्यापैकी दोघे सध्या जामिनावर असून, शेख शमीर ऊर्फ समीर उर्फ भांजा शेख झाकिर (वय २१) आणि रेहानुद्दिन ऊर्फ भांजा रेहान नईमोद्दिन (२१) या दोघांची न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

बदल्याची आग पुन्हा...

सोमवारी (ता. २०) दुपारी दोनला त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार होते. आपल्या मुलाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी दोघांवर न्यायालयातच गोळीबार करून त्यांचा खून करण्याचा डाव धम्मप्रियचे वडील मनोहर सुरळकर याने त्याच्या मित्रासह रचला होता. त्यासाठी काही दिवसांपूर्वीच त्याने दोन गावठी कट्टे आणि अतिरिक्त काडतूस खरेदी केले होते.

पोलिस अधीकांकडून पाहणी

घटनेनंतर पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. हत्येच्या या खटल्याची आता यापुढे ‘व्हीसी’द्वारे सुनावणी घेणार असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

Police arresting Burkhadhari Manohar
Jalgaon Fraud Crime : बिझनेस लोनच्या नावे 24 लाखांत गंडविले

बुरखा घालून बसले

सोमवारी दुपारी साधारण अडीचच्या सुमारास जेलबंदी आणणारी गाडी येणार असल्याने दुपारी साडेबारापासून मनोहर आणि त्याचा मित्र रवी असे दोघेही बुरखा घालून न्यायालयाच्या प्रवेशद्वारालगत असलेल्या मोरोक्को हॉटेलसमोरच दत्तमंदिराच्या ओट्यावर दबा धरून बसले होते.

बुरखा, पायात बूट आणि महिलेची पर्स अशा या महिला दिसणाऱ्या दोघांकडे पाहिल्यावर तेथील एकाने शहर पोलिसांना घटनेची माहिती दिली. दोघांची चौकशी केल्यावर त्यांची बोबडी वळली. पोलिसांनी गराड्यातच दोघांची झडती घेतली व मनोहरला ताब्यात घेतले. मात्र त्याचा साथीदार रवी पळून जाण्यात यशस्वी ठरला. त्याच्या पर्समध्ये गावठी कट्टा, पाच जिवंत काडतूस मिळून आले. दोघांविरुद्ध जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

Police arresting Burkhadhari Manohar
Bharat Agency : जळगावातील भारत एजन्सीला आग; अग्निशमन दलाची तत्परता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com